एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आबासाहेबांची हि मुलगी आहे एक प्रसिद्ध बॉडीबिल्डर! पहा फोटो..

मराठी चित्रपटसृष्टीत खलनायक म्हणून गाजलेले काही खास चेहरे आहेत. नागेश भोसले हे त्यातले एक नाव. अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये खलनायकी भूमिका साकारत प्रेक्षकांच्या मनात धडकी भरवण्याचे काम त्यांनी केले आहे.

सध्या त्यांचा स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘तुझ्या इश्काचा नाद खुळा’ या मालिकेतील खलनायक प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. त्यांची ही भूमिका नेहमीसारखीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. नागेश भोसले जेव्हा एखादा खलनायक साकारतात तेव्हा असे वाटते, की किती सहज ही व्यक्तिरेखा त्यांनी जमवून आणली आहे.

मालिकांबद्दल बोलायचं झालं, तर २०१२ मध्ये प्रसारीत झालेल्या ‘देवयानी’ या स्टार प्रवाह वरील मालिकेतील त्यांच्या आबासाहेब विखे-पाटील या व्यक्तिरेखेने त्यांना बरीच प्रसिद्धी मिळवून दिली आहे. नागेश भोसले यांनी मराठीसह हिंदी चित्रपटांमधूनही आपला दबदबा निर्माण केला आहे.

या देखील खलनायकी ढंगाच्याच भूमिका आहेत. अभिनयाबरोबरच त्यांनी निर्मिती आणि दिग्दर्शन क्षेत्रातही नाव कमावले आहे. ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’ (२००९) सारखे चित्रपट त्यांनी चित्रपटसृष्टीला दिले आहेत.

अशा या हरहुन्नरी कलाकाराची पत्नी देखील याच क्षेत्रात काम करते. त्यांच्या पत्नी जॉय भोसले यांनी नाट्यक्षेत्रात काम करत नाट्यनिर्माती म्हणून नाव कमावले आहे. नागेश आणि जॉय यांना दोन मुले आहेत. आई-वडील दोघेही चित्रपटसृष्टीत असतील तर मुलेदेखील सहसा याच क्षेत्रात आपले करिअर करतात. मात्र नागेश आणि जॉय च्या मुलांची गोष्ट वेगळी आहे. विशेषतः त्यांच्या मुलीची.

नागेश यांच्या मुलीचे नाव कुहू भोसले आहे. वयाच्या १७ व्या वर्षीच कुहूने बॉडीबिल्डर होण्याचा निर्णय घेतला. महिलांमध्ये फिटनेसची क्रेझ वाढत असली तरी बॉडीबिल्डींगच्या क्षेत्रात नाव कमावणाऱ्या मोजक्याच आहेत.

कुहू एक प्रसिद्ध आंतरराष्ट्रीय बिकिनी ऍथलिट आणि वुमन बॉडीबिल्डर आहे. तसेच ती फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करते. कुहूने ऍथलिट म्हणून एमचर ऑलिंपिया मध्ये कांस्य पदक मिळवले आहे.

सोशल मीडिया वर ती नेहमी आपले फिटनेसचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. तिच्या करिअर निवडीमध्ये घरच्यांनी नेहमीच पाठींबा दर्शवला आहे, असे कुहू म्हणते. आपल्या मुलीला तिच्या करिअर मध्ये नागेश यांनी पूर्ण पाठींबा दिला आहे.

यावर बोलताना नागेश भोसले म्हणाले, “प्रत्येक मुलाला त्याच्या आवडीनुसार करिअर करण्याचा अधिकार आहे. माझ्या मुलीनंही तिला आवडणाऱ्या क्षेत्रात काम करण्याचा निर्णय घेतलाय. मला त्याचा आनंदच आहे. निर्णय बदलण्यासाठी मी कधी तिच्यावर दबाव टाकला नाहीये.” वेगळी वाट निवडत त्यात यशस्वी होऊन दाखवणाऱ्या कुहू भोसलेचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

You might also like