एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अखेर मौन सुटले! समंथा आणि नागा चैतन्य यांच्या घट’स्फो’टावर पहिल्यांदाच सासरे नागार्जुन यांचे वक्तव्य…

शनिवारी २ ऑक्टोबर २०२१ रोजी एका प्रसिद्ध दाक्षिणात्य जोडीने एकमेकांपासून वेगळे होत असल्याचे अधिकृत वक्तव्य सोशल मीडिया वरून जाहीर केले. ती जोडी आहे अभिनेत्री समंथा रूथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य. ऑक्टोबर २०१७ मध्ये या दोघांनी लग्न केले होते. २०१० पासून दोघे एकमेकांना डे’ट करत होते. गेल्या काही महिन्यांपासून समंथा आणि नागा चैतन्यच्या वेगळे होण्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर या दोघांनी आपला घट’स्फो’टाचा निर्णय जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम लावला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून समंथा आणि नागा चैतन्यच्या नात्यात तेढ आली असल्याचे बोलले जात होते. त्यामुळे दोघे मॅरेज काऊन्सलर चा सल्ला घेत असल्याच्याही बातम्या येत होत्या. इतकेच काय, तर समंथाच्या सासऱ्यांनी म्हणजेच सुप्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांनी देखील या दोघांमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. पण सगळ्याच प्रयत्नांना फोल ठरवत समंथा आणि नागा चैतन्यचा चार वर्षांचा संसार संपुष्टात आला आहे.

यानंतर प्रथमच नागार्जुन यांनी यावर वक्तव्य केले आहे. त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वरून याबाबत माहिती दिली. ते ट्विट करत म्हणाले, “समंथा आणि चैतन्य यांच्यात जे काही घडले ते अत्यंत दुर्दैवी आहे. ही त्या दोघांची वैयक्तिक बाब आहे.” आपल्या या पोस्ट मध्ये ते पुढे म्हणतात, “हे मी जड अंतःकरणाने सांगतो. समंथा आणि चैतन्य यांच्यात जे घडले ते दुर्दैवी आहे.

पती-पत्नीमध्ये जे काही घडलं ते अत्यंत वैयक्तिक आहे. समंथा आणि चैतन्य दोघेही मला प्रिय आहेत. माझे सर्व कुटुंब या दोघांच्या निर्णयासोबत आहे. मी समंथासोबत घालवलेले क्षण आणि ती नेहमीच आमच्या सर्वांसाठी खास असेल. देव दोघांनाही आशीर्वाद देवो.”

नागा चैतन्य नागार्जुन यांच्या पहिल्या पत्नी लक्ष्मी डग्गुबत्तीचा मुलगा आहे. नागा चैतन्यचा जन्म १९८६ मध्ये झाला. नागा चैतन्यने बालकलाकार म्हणून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. १९९० मध्ये नागार्जुन आणि लक्ष्मीचा घट’स्फो’ट झाला. १९९२ मध्ये नागार्जुनने अभिनेत्री अमलाशी लग्न केले. या दोघांना अखिल अक्किनेनी नावाचा मुलगा आहे. तो देखील दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये अभिनेता म्हणून काम करतो.

समंथा आणि नागा चैतन्यच्या घट’स्फो’टामुळे त्यांच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. त्यांचे अनेक चाहते ‘जे झाले ते चांगले झाले नाही’, ‘तुमच्या घट’स्फो’टामुळे आम्ही खूप दुखावले गेलो आहोत’ अशा प्रतिक्रिया देत आहेत.

You might also like