एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

नागा चैतन्यबरोबर घट’स्फो’ट घेतल्यानंतर समंथाने घेतला असा निर्णय! बदलले आपले…

अलीकडेच नागा चैतन्य आणि समंथा या दाक्षिणात्य स्टार जोडीने आपला घट’स्फो’ट जाहीर केला. ऑक्टोबर २०१७ मध्ये हे दोघे लग्नबंधनात अडकले. आता ऑक्टोबर २०२१ मध्ये दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दोघेही २०१० पासून एका चित्रपटात एकत्र काम केल्यानंतर एकमेकांना डे’ट करू लागले होते. त्यांच्यात चांगली मैत्री असल्याचेही बोलले जात होते. मात्र दोघांनी अचानक वेगळे होण्याचा निर्णय का घेतला, यामागील नेमके कारण कळू शकलेले नाही.

समंथा लग्नानंतरही चित्रपटांमध्ये बोल्ड सीन देत होती आणि हे तिच्या सासऱ्यांना म्हणजेच अभिनेते नागार्जुन यांना मान्य नव्हतं, असं म्हटलं जातं. यावर समंथाने आपल्या नात्यापेक्षा आपल्या करिअरला प्राधान्य दिल्याने हा घट’स्फो’ट झाला असल्याचं बोललं जात आहे. मात्र समंथा आणि नागा चैतन्य या दोघांनीही यावर कोणतेही अधिकृत भाष्य केलेले नाही. त्यामुळे त्यांच्या नात्याचा शेवट नक्की कोणत्या कारणाने झाला, हे समजू शकलेले नाही.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

शनिवारी २ ऑक्टोबर रोजी या दोघांनीही आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर आपल्या घट’स्फो’टाची घोषणा केली. त्यांचे चाहते त्यांच्या या निर्णयामुळे दुखावले गेले आहेत. दोघांनीही या पोस्ट वरील कमेंट सेक्शन बंद ठेवला आहे. त्यामुळे दोघांनाही या संपलेल्या नात्याबद्दल बोलण्यात रस नाही आणि बाकीच्यांनीही याबाबत त्यांच्याशी बोलू नये, असा अर्थ या सगळ्यातून काढला जात आहे.

दरम्यान समंथाने एक मोठा निर्णय घेतला आहे. तिच्या या निर्णयामुळे समंथा आणि नागा चैतन्य यांच्यात आता खरोखरच काही शिल्लक राहिले नाही, याची प्रचिती आली. समंथाने लग्नानंतर आपल्या सगळ्या सोशल मीडिया हॅन्डल्स वर आपले नाव बदलून सासरच्या नावाने ‘समंथा अक्किनेनी’ असे नाव ठेवले होते. मात्र घट’स्फो’टाची घोषणा केल्यानंतर तिने पुन्हा आपल्या सगळ्या सोशल मीडिया हॅन्डल्स वरील नावे बदलली आहेत. ‘समंथा अक्किनेनी’ हे नाव बदलून तिने ‘समंथा रुथ प्रभू’ असे नाव ठेवले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Samantha (@samantharuthprabhuoffl)

समंथाच्या या निर्णयाने समंथा आणि नागा चैतन्यच्या चाहत्यांमध्ये असलेली उरली सुरली आशा देखील संपुष्टात आली आहे. दोघांच्या तुटलेल्या नात्याला आता कोणीच वाचवू शकत नाही, असाच अर्थ यावरून घेतला जात आहे. या दोघांच्याही नवीन पोस्ट्स वर त्यांच्या चाहत्यांनी ‘तुमच्या तुटलेल्या नात्याचा आम्हाला त्रा’स होतो आहे’, ‘जे झाले ते चांगले झाले नाही’ अशा आशयाच्या कमेंट्स करायला सुरुवात केली आहे.

You might also like