एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मधील चिमुरडी ओळखली का? या आधी ती ओळखली जात होती यासाठी…

झी मराठी वाहिनीवर सध्या नव्या मालिकांची चलती आहे. आता यामध्ये एजून एका मालिकेची भर पडली आहे. ही मालिका आहे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. ही मालिका २३ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

सध्या या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. या मालिकेतून अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

श्रेयस तळपदेने या आधी आभाळमाया, अवंतिका आणि दामिनी अशा मालिकांमधून काम केले आहे. प्रार्थना बेहरेने देखील आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात ‘पवित्र रिश्ता’ या हिंदी मालिकेतून केली होती.

हे दोन्ही कलाकार मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम करत असतात. आता हे दोघे छोट्या पडद्यावर एकत्र कामी करणार असल्याने या दोघांची केमिस्ट्री बघण्याकरता प्रेक्षक उत्सुक आहेत.

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नव्या मालिकेचा प्रोमो जसा या दोघांच्या कमबॅक मुळे गाजतो आहे, तसाच तो अजून एका कारणाने चर्चेत आहे. या प्रोमोमध्ये आपल्याला एक चिमुरडी देखील पाहायला मिळत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaikul (@_world_of_myra_official)

बऱ्याच जणांसाठी या चिमुरडीचा चेहरा नवीन असला तरी सोशल मीडिया वर सक्रीय असणाऱ्या नेटकऱ्यांसाठी मात्र तो फारच ओळखीचा आहे. ‘टिकटॉक स्टार’ म्हणून ओळखली जाणारी ही चिमुरडी आहे मायरा वायकुळ. तिचे अनेक व्हिडिओ फार प्रसिद्ध आहेत.

मायराचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाऊंट असून यावर ती तिचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते. ‘मायराज् कॉर्नर’ (Myra’s Corner) नावाचे तिचे स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील आहे. यूट्यूब वर तिचे ९३ हजारच्या वर सबस्क्राइबर्स आहेत, तर इंस्टाग्राम वर ५७ हजारच्या वर फॉलोवर्स आहेत. या दोन्ही अकाऊंट वरून ती आपले वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असते. मायरा खूपच गोड दिसते आणि तिच्या व्हिडिओ मधल्या हावभावांमुळे ती नेटकऱ्यांची लाडकी आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_)

‘माझी तुझी रेशीमगाठ’ या नव्या मालिकेच्या प्रोमोमध्ये ती श्रेयस तळपदे बरोबर लग्नाची बोलणी करताना दिसत आहे. आपल्या गोड आवाजाने आणि निरागस लूक्स नी मायराने प्रेक्षकांची मने आधीच जिंकून घेतली आहेत.

मालिका सुरू झाल्यानंतर तिच्या अभिनयाची झलक देखील बघायला मिळेल. श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे आणि मायरा वायकुळ मुळे प्रेक्षक ही मालिका लवकरात लवकर सुरू होण्याची वाट बघत आहेत.

You might also like