एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘तुझी माझी रेशीमगाठ’ फेम मायरा सजली पारंपारिक वेशभूषेत! पहा आई-बाबांबरोबरचे फोटो…

सध्या झी मराठी वाहिनी वरील ‘तुझी माझी रेशीमगाठ’ मालिकेने प्रेक्षकांना कमी कालावधीतच आपलेसे केले आहे. यश आणि नेहा च्या नात्याला फुटणारे मैत्रीचे अंकुर प्रेक्षकांना आवडू लागले आहेत. श्रेयस तळपदे आणि प्रार्थना बेहरे यांनी आपल्या यश आणि नेहाच्या भूमिकांमध्ये खूप छान रंग भरले आहेत.

मालिकेतील इतर कलाकार म्हणजे संकर्षण कऱ्हाडे, मोहन जोशी, शीतल क्षीरसागर यांनी प्रमुख पात्रांना खूप छान साथ दिली आहे. मालिकेचे खरे आकर्षण मात्र चिमुकली परी आहे.

नेहाच्या गोड मुलीची म्हणजेच परीची भूमिका मायरा वायकुळ या बालकलाकाराने साकारली आहे. आपल्या निरागस अभिनयाने मायराने सगळ्या प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

मायरा सोशल मीडिया वर खूप सक्रीय आहे. तिची आई श्वेता वायकुळ तिचे अकाऊंट हॅण्डल करते. मायराचे अनेक धमाल व्हिडिओ सोशल मीडिया वर आपल्याला बघायला मिळतात. तिचे अनेक गोड फोटो देखील सोशल मीडिया वर अपलोड केलेले बघायला मिळतील. सध्या तिचे असेच काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

विशेष म्हणजे हे केवळ मायराचे फोटो नसून तिचे आई आणि बाबाही या फोटोंमध्ये आहेत. मायरा आणि तिच्या आईबाबांनी मस्त पारंपारिक वेषभूषेमध्ये आपले फोटोशूट करून घेतले आहे. एकमेकांना मॅचिंग असलेले कपडे घालून या तिघांनी आपले झकास फोटोशूट केले आहे. निळ्या आणि वांगी रंगाचे हे खणाचे कपडे तिघांनाही खूप उठून दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

मायराच्या आईने छान नऊवारी नेसत त्यावर हिरवा चुडा आणि ऑक्सिडाइज्ड दागिने घातले आहेत. तर मायराच्या बाबांनी धोतर नेसले आहे. मायराने घातलेल्या परकर आणि पोलक्यामध्ये ती खूपच गोड दिसत आहे. मायराने देखील ऑक्सिडाइज्ड दागिने घातले आहेत. तिघांनीही आपले वेगवेगळ्या पोज मधले फोटोशूट करून घेतले आहे. या फोटोशूटला चाहत्यांची खूप पसंती मिळत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

एका फोटोमध्ये तिघेही हातात हात घालत चालत येत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये मायराच्या आई आणि बाबांनी मायराला उचलून घेतले आहे. मायरा आणि मायराच्या आईने मिळून मायलेकींचे स्पेशल असे फोटोशूट केलेले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायरा सगळ्या फोटोंमध्ये खूप गोड दिसते आहे. मायराने साकारलेली परीच्या भूमिकेबद्दल तिचे खूप कौतुक होताना दिसत आहे. तिची इतक्या लहान वयातली अभिनयाची समज भल्याभल्यांना चकित करत आहे. तर दोस्तहो, मायराचा अभिनय आणि तिचे हे फोटोशूट तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर कळवा.

You might also like