एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटातील बालकलाकार आठवतोय का? आत्ता झालाय एवढा मोठा, करतोय या क्षेत्रात काम..

बॉलिवूड अभिनेता आमिर खान आणि काजोलचा सुपरहिट चित्रपट ‘फना’ चित्रपटाला नुकतीच १५ वर्षे पूर्ण झाली. यशराज फिल्मने निर्मित केलेल्या या चित्रपटाने २००६ साली सुपरहिट यादीत नाव मिळवलं होत. चित्रपटाची कथा एक अंध मुलगी आणि द ह श त वा दी यांच्यातील प्रेम संबं’धांवर आधारित होती. आमिर खान आणि काजोलच्या प्रेम कथावर आधारित फिल्म ‘फना’ मध्ये त्याची विशेष भूमिका होती. या चित्रपटात ते त्यांच्या मुलाच्या भूमिकेत होते.

या चित्रपटात एका छोट्या मुलाची भूमिका साकारणारा अली हाजी आता २१ वर्षांचा झाला आहे. अलीचा जन्म १९९९ मध्ये मुंबई येथे झाला होता. अली आत्ता इंडस्ट्रीमध्ये लेखक आणि दिग्दर्शक म्हणून काम करतो, अली हाजींचा पहिला चित्रपट ‘जस्टि’स फॉर गुड कंटेंट’ हा आहे. या चित्रपटात त्यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून दोन्ही बाजू हाती घेतल्या होत्या.

‘जस्टि’स फॉर गुड कंटेंट’, या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून अली हाजी यांनी उत्तम काम केले होते. मोहन नादर आणि केतकी पंडित मेहता यांनी या चित्रपटाचे निर्मिती केली होती. ‘जस्टिस फॉर गुड कंटेंट’ या चित्रपटात राज झुत्शी, डेलनाझ इराणी, विजय पाटकर, सुरेश मेनन आणि राजकुमार कनौजिया अशे सुप्रसिद्ध कलाकार प्रमुख भूमिकेत होते.

अली हाजीबद्दल बोलायला गेलं तर बाल कलाकार म्हणून त्यांनी खूप भूमिका केल्या आहेत, २००६ मध्ये त्यांनी पाहिल्यानंदा ‘फॅमिली’ चित्रपटात काम केल. चित्रपटात तो अमिताभ बच्चन यांच्या नातवाच्या भूमिकेत होता पण त्याला ‘फना’ या चित्रपटातून ओळख मिळाली. तो या चित्रपटामुळे फेमस झाला.

७ वर्षाच्या अलीला २००६ मध्ये रिलीज झालेल्या ‘फना’ या चित्रपटातून चांगली ओळख मिळाली. त्याच्या भोळेपणाने आणि गोंडस पणाने सर्वांची मने जिंकले होती, यानंतर तो ‘पार्टनर’, चित्रपटात सलमान खानमध्ये दिसला. सैफ आणि राणीचा चित्रपट ‘तारा रम पम’, यात त्याला प्रेक्षकांनी चांगली दाद मिळाली.

साल २००८ मध्ये तो ‘द्रोणा’ या चित्रपटात दिसला. २००० साली त्याने ‘माय फ्रेंड गणेशा’ या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारली होती. अली याने १०० हून अधिक टीव्ही जाहिरातीं केल्या आहेत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की जेव्हा तो ८ महिन्यांचा होता तेव्हा त्याने प्रथम एड जॉन बेबी साबणची जाहिरात केली होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ali Haji (@iamalihaji)

अलीला कोणत्याही चित्रपटात नायक म्हणून मुख्य भूमिका मिळाली नाही पण आत्ता तो चित्रपट निर्मितीत हात घालायचा प्रयत्न करतोय. त्याचबरोबर तो सोशल मीडियावरही खूप अ‍ॅक्टिव असतो. त्याच्या इन्स्टाग्रामवर त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत आणि तो आपल्या बालपणाशी संबंधित आठवणी सतत शेअर करत असतो.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

 

You might also like