एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘गोलमाल’ चित्रपटातील मुरलीची पत्नी आहे ‘ही’ अभिनेत्री! त्याआधी होती या अभिनेत्याची पत्नी…

‘गोलमाल’ चित्रपट पाहिला नाही आणि तो आवडला नाही असा सिनेरसिक मिळणे नाही. या चित्रपटाने रसिकांना खूप हसवले आहे. यातली सगळीच पात्रं सिनेरसिकांच्या मनात आजही घर करून आहेत. या चित्रपटाच्या पुढच्या भागांनीही तेवढीच मजा आणली आहे. यातलाच एक कलाकार म्हणजे मुरली शर्मा. ‘गोलमाल रिटर्न्स’ (२००८) मध्ये त्यांनी गोल्डन फिशरीज् च्या एमडी सावंत ची भूमिका निभावली होती.

त्यांनी अनेक हिंदी, मराठी, तेलगू, तमिळ आणि मल्याळम मिळून जवळपास १३० चित्रपटांमध्ये काम केले आहे. मकबूल, मैं हूँ ना, काल, धमाल, ढोल, लागा चुनरी में दाग, जाने तू या जाने ना, गोलमाल रिटर्न्स, दबंग, गोलमाल ३, सिंघम, अजिंठा, कर्म योद्धा, येवडू, सावित्री, गोलमाल अगेन, साहो, स्ट्रीट डान्सर ३D या आणि अशा बऱ्याच चित्रपटांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

मुरली शर्मा यांनी बऱ्याच हिंदी मालिकांमध्येही काम केले आहे. कॉमेडी असो वा खलनायकी भूमिका असो, मुरली यांनी नेहमीच त्यांच्या भूमिकांमध्ये रंग भरले आहेत. मुरली यांच्या कामाचे चाहते खूप आहेत. मात्र मुरली नेहमीच प्रसारमाध्यमे आणि सोशल मीडिया पासून लांब राहणे पसंत करत आले आहेत.

फार कमी लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल माहिती आहे. तुम्हाला माहीत आहे का, की त्यांची पत्नी देखील एक अभिनेत्री आहे? त्यांच्या पत्नीचे नाव आहे अश्विनी काळसेकर. ऐकून आश्चर्य वाटलं ना? अश्विनी काळसेकर या आपल्या मराठी आणि हिंदी इंडस्ट्री मधील कामासाठी ओळखल्या जातात.

त्यांनी काही दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही काम केले आहे. शांती, सीआयडी, शक्तिमान, सिद्धांत, कसम से, झांसी की रानी, अफसर बिटीया, जोधा अकबर, अदालत, कवच यांसारख्या अनेक मालिकांमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे.

अश्विनी काळसेकर यांचे मुरली शर्मा यांच्याबरोबर झालेले हे दुसरे लग्न आहे. त्यांचे पहिले लग्न अभिनेता नितेश पांडे बरोबर झाले होते. १९९८ मध्ये झालेले हे लग्न काही कारणांनी टिकू शकले नाही आणि २००२ मध्ये ते दोघे वेगळे झाले. पुढे अश्विनी काळसेकर यांची ओळख मुरली शर्मा यांच्याशी झाली. ओळखीतून प्रेम वाढत गेले आणि २००९ मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली.

कशी वाटली या दोघांची जोडी? आम्हाला कमेंट्स मध्ये जरूर सांगा. आमचे आवडलेले लेख नक्की लाईक आणि शेअर करा.

You might also like