एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मुन्नाभाई एमबीबीएस’ चित्रपटामध्ये जादूची झप्पी देणारा हा अभिनेता आता एका गुहेत घालवत आहे आपले आयुष्य, झाली आहे अशी स्थिती..पाहून ध’क्का बसेल

संजय दत्तच्या कारकीर्दी मधील सर्वात यशस्वी चित्रपट मुन्ना भाई एमबीबीएस तुम्ही नक्कीच पहिला पहिला असेल. हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता. २००३ मध्ये रिलीज झालेला मुन्ना भाई एमबीबीएस हा एक विनोदी बॉलिवूड चित्रपट आहे. संजय दत्त आणि अरशद वारसी यांनी या चित्रपटामध्ये मुख्य भूमिका साकारल्या आहेत.

या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते आणि या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर कमालीचे यश मिळवले होते. या चित्रपटाच्या एका सीन मध्ये संजय दत्तने एका सफाई कर्मचार्‍याला जादूची झप्पी दिली होती. या चित्रपटामध्ये सफाई कर्मचाऱ्याची भूमिका अभिनेता सुरेंद्र राजन यांनी केली होती. हे खूपच कमी लोकांना माहित असेल कि सुरेंद्र राजन आता मुंबईत नव्हे तर हिमालयात स्थायिक झाले आहेत.

वयाच्या ८० व्या वर्षी सुरेंद्र राजन हिमालयातील नैसर्गिक वातावरणामध्ये राहत आहेत. मुन्नाभाई एमबीबीएस या चित्रपटामध्ये सुरेंद्र राजनने अगदी छोटय़ा पात्राची भूमिका साकारली होती. मात्र, या चित्रपटानंतर त्यांनी अभिनय करणे बंद केले. आता त्यांची प्रकृती अशी बनली आहे की ते पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

सुरेंद्र राजन उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील खुन्नू गावात राहतात. त्याचे घर गुहेच्या आकाराचे आहे, जे त्यांनी सेवानिवृत्त सैन्यदाराकडून घेतले आहे. पूर्वी या घरात चहाचे दुकान होते. या गावात जाण्यासाठी सुरेंद्र यांना १७ कि.मी.चा डोंगर चढावा लागतो. ते तीन-चार महिन्यातून शहरात येऊन आवश्यक वस्तू घेऊन जातात.

लॉ क डा उ नच्या आधी सुरेंद्र राजन मुंबई मध्ये आले होते, परंतु लॉ क डा उन लागल्यानंतर ते मुंबईत अ’डकले होते. ज्यामुळे त्यांना बऱ्याच अडचणींना सामोरे जावे लागले. त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदत मागितली. यानंतर सोनू सूद त्यांच्या मदतीसाठी पुढे आला.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like