एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘डान्सिंग मुंबई पोलीस’ अफलातून डान्स व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल

पोलीस म्हणजे गंभीर व्यक्तिमत्व, सदैव तत्पर, मदतीला धावून येणारे, नागरिकांचे मित्र पण तेवढाच वचक ठेवून असणारे. मित्रांनो, आपल्या सगळ्यांच्या मनात पोलिसांची हीच प्रतिमा वर्षानुवर्षे आहे. पण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका व्हिडिओ ने पोलिसांची ही गंभीर प्रतिमा थोडी सौम्य केली आहे.

ऑन ड्युटी २४ तास म्हणत नेहमी जनसेवेसाठी तत्पर असणाऱ्या या पोलिसांना स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला देण्यासाठी काही वेळ उरत असेल का, तसेच मोकळ्या वेळेत हे लोक नक्की काय करत असतील असे प्रश्न लोकांना पडत असतात. हा व्हिडिओ त्यावरचे उत्तर आहे, असे म्हणायला हरकत नाही.

सध्या सोशल मीडिया वर ‘डान्सिंग मुंबई पोलीस’ हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये पोलीस दलातील अमोल कांबळे हे ‘आया है राजा…’ या गाण्यावर भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. त्यामुळे सध्या ते सोशल मीडिया स्टार बनले आहेत. त्यांच्या या व्हिडिओला भरभरून लाईक्स मिळत आहेत आणि लोक मोठ्या प्रमाणावर हा व्हिडिओ शेअर करताना दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinmay Khedekar || TWE 🇮🇳 (@thewardrobeengineer)

अमोल कांबळे यांना डान्सची आवड आहे. या आधी ते टिकटॉकवर आपले डान्स व्हिडिओ शेअर करत असत. मात्र एकल्याकडे टिकटॉक बॅन झाल्यानंतर त्यांनी इंस्टाग्राम वर आपले व्हिडिओ शेअर करायला सुरुवात केली.

आधी त्यांनी इंस्टाग्राम वर आपले जुनेच व्हिडिओ पोस्ट केले होते. नंतर हळूहळू त्यांनी आपले नवीन व्हिडिओ बनवून शेअर करायला सुरुवात केली. त्यांच्या डान्सचे कौतुक होऊ लागले आणि त्यांचे व्हिडिओ व्हायरल होऊ लागले.

आपल्या सुट्टीच्या दिवसात थोडा वेळ काढून अमोल कांबळे आपले हे डान्स व्हिडिओ बनवत असतात. अमोल कांबळे यांच्या मते, डान्स केल्याने टेन्शन कमी होते. त्यांच्या या व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमुळे त्यांच्या आईला ते एक सेलिब्रेटी वाटू लागले आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Amol Kamble (@amolkamble2799)

अमोल यांच्या आईचे म्हणणे आहे की त्यांनी कधी कोणता सेलिब्रेटी बघितला नव्हता, पण आता त्यांचा मुलगाच एक सेलिब्रेटी बनला आहे. अमोल कांबळे यांनी २०१४ मध्ये झालेल्या ‘उमंग अवॉर्ड्स’ मध्ये अमोल यांनी अभिनेता हृतिक रोशन बरोबर डान्स केला होता.

अमोल कांबळेंनी म्हटले आहे की जर एखाद्या डान्स रिऍलिटी शो मध्ये त्यांना बोलावणं आलं, तर त्यांना त्या शो चा भाग व्हायला नक्की आवडेल. इतका त्यांना डान्स करायला आवडतो. जेव्हा त्यांना समजले की त्यांचा डान्स व्हिडिओ व्हायरल झाला आहे, तेव्हा त्यांना खूप आनंद झाला.
Source: Insta/amolkamble2799

You might also like