एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मुळशी पॅटर्न’ मधील राहुल्या बद्दल ‘या’ गोष्टी माहीत आहेत का तुम्हाला?

२०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने अनेक चेहऱ्यांना प्रसिद्धी मिळवून दिली. ‘देऊळ बंद’ (२०१५) नंतर प्रवीण तरडे यांचा दिग्दर्शक म्हणून ‘मुळशी पॅटर्न’ हा दुसरा चित्रपट. दोन्ही चित्रपट वेगळ्या पठडीतले असले तरी दोन्ही चित्रपटांनी यश पाहिले आहे. शेतकरी, गु’न्हे’गारी आणि पोलीस यांच्यावर केंद्रीत असलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट त्याच्या कथानकामुळे बराच गाजला.

यातले संवादही खूप गाजले. कलाकारांनी ज्या पद्धतीने हे संवाद म्हटले आहेत, ते पाहिले असता हे कलाकार किती मुरलेले आहेत हे लक्षात येतं. त्यांच्या झकास अभिनय कौशल्यामुळेच हे संवाद आजही लोकांच्या लक्षात आहेत.

या चित्रपटातील गाजलेले एक पात्र म्हणजे राहुल्या. बिनधास्त, बेधडक वागणारा, पण जीवावर बेतल्यावर जिवाच्या आकांताने पळणारा राहुल्या प्रेक्षकांना भलताच आवडून गेला. ही भूमिका साकारली होती ओम भुतकर या अभिनेत्याने. ओमचा जन्म १ मार्च १९९१ रोजी पुण्यात झाला. त्याला लेखन करायला आणि फिरायला खूप आवडते. त्याने पुण्याच्या अभिनव हायस्कूल मधून आपले शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. पुण्याच्याच बीएम कॉलेज मधून त्याने एम कॉम केले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ओम भुतकर ( चाहता वर्ग ) (@om_bhutkar_fan_club)

२००५ मध्ये त्याने ‘छोटा सिपाही’ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केले होते. त्यासाठी त्याला ‘उत्कृष्ट बालकलाकार’ हा राष्ट्रीय पातळीवरील पुरस्कार मिळाला. त्याने अनेक मराठी नाटक आणि चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

मात्र ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाने त्याला एक वेगळी ओळख मिळवून दिली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचे बरेच कौतुक झाले. सुखन, आषाढातील एक दिवस, मी गालिब, दोन शूर, अपराधी सुगंध, विठा अशा नाटकांमध्ये त्याने आपल्या अभिनयाची जादू दाखवून दिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ओम भुतकर ( चाहता वर्ग ) (@om_bhutkar_fan_club)

नाळ (२०१८), लाठे जोशी (२०१८), न्यू’ड (२०१८), बारायण (२०१८), फास्टर फेणे (२०१७), जिंदगी विराट (२०१७), आजोबा (२०१४), यशवंतराव चव्हाण- बखर एका वादळाची (२०१४), पितृऋण (२०१३), अस्तु (२०१३), चिंटू (२०१२), एक कप च्या (२००९) यांसारख्या चित्रपटात ओमने काम केले आहे. त्याने २००९ मध्ये स्टार प्रवाह वाहिनी वर प्रसारीत होणाऱ्या ‘अग्निहोत्र’ या मालिकेतही भूमिका निभावली होती.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ओम भुतकर ( चाहता वर्ग ) (@om_bhutkar_fan_club)

तर मंडळी, बेधडक राहुल्याच्या खऱ्या आयुष्याबद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली? ओमचा अभिनय तुम्हाला कसा वाटतो? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचे आवडलेले लेख लाईक करा आणि शेअर देखील करा.

You might also like