एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मन झालं बाजिंद’ मधील मुंज्याचा कोथिंबीर डान्स होतोय व्हायरल! नेटकऱ्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया…

‘सैराट’ (२०१६) चित्रपटातून जसे आर्ची आणि परश्या प्रसिद्ध झाले तसे सल्या आणि लंगड्याची जोडी देखील लोकांना खूप आवडून गेली. चित्रपटात सल्याचे काम अरबाज शेख ने केलं होतं, तर लंगड्याची भूमिका तानाजी गलगुंडे ने निभावली होती. ही सल्या आणि लंगड्याची जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

झी मराठी वाहिनी वर नव्याने सुरू झालेल्या ‘मन झालं बाजिंद’ मालिकेत हे दोघे आपल्याला काम करताना दिसत आहेत. अरबाज रायाचा मित्र घेतला आहे, तर तानाजीने कृष्णाच्या मित्राची भूमिका साकारली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

‘मन झालं बाजिंद’ मालिकेत आपल्याला कृष्णा आणि रायाची लव्ह स्टोरी पाहायला मिळणार आहे. कृष्णाची भूमिका अभिनेत्री श्वेता राजन साकारत आहे, तर अभिनेता वैभव चव्हाण आपल्याला रायाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या राया आणि कृष्णा मधली नोकझोक प्रेक्षकांचे उत्तम मनोरंजन करत आहे. लवकरच या दोघांमधले फुलणारे प्रेमही बघायला मिळेल. मालिकेतील कलाकारांचे अभिनय प्रेक्षकांची मने जिंकून घेत आहेत.

सध्या ‘मन झालं बाजिंद’ ही मालिका एका वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. मालिकेतील मुंज्याची भूमिका करणारा तानाजी याचे कारण आहे. सध्या या मुंज्याचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर भलताच व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडिओ मध्ये मुंज्या दोन्ही हातात कोथिंबिरीच्या दोन पेंड्या घेऊन भलताच नाच करताना दिसत आहे. खरंतर तो आपल्या या कृतीने कोथिंबीर विकण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र त्याच्या या अतरंगी डान्सनेच सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

त्याच्या या डान्स वर लोकांनी खूप कमेंट्स केल्या आहेत. ‘लई भारी, आम्हाला पण शिकवा डान्स’, ‘हे नक्की काय होतं? भूत झपाटल्यासारखं करतोय’, ‘५० रुपये कट करा याचे’, ‘प्रो लेव्हल मार्केटिंग’ अशा गमतीदार कमेंट्स नेटकऱ्यांनी या व्हिडिओ वर केल्या आहेत. एकाने तर चक्क ‘आज नको, पुढल्या खेपेला घेतो’ अशीही कमेंट केली आहे. एका नेटकाऱ्याला तर मुंज्याचा हा डान्स बघून चक्क आयपीएल ची आठवण आली. सध्या हा डान्स ‘मुंज्याचा कोथिंबीर डान्स’ म्हणून खूप लोकप्रिय होत आहे.

मालिकेचा बाज कोणताही असला, तरी अशा व्यक्तिरेखा मूड हलका ठेवायचा प्रयत्न करतात. त्यांच्या वेड्या चाळ्यांमुळेच खरंतर लोकांचं मनोरंजन होत असतं. तुमच्या मनोरंजनासाठी आम्हीही असेच सज्ज असतो. त्यामुळे आमचे लेख वाचत चला आणि आवडलेले लेख लाईक आणि शेअर देखील करा.

You might also like