एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

धोनीला लागलाय आता भलताच नाद! वैतागली आहे बायको साक्षी..

सर्वप्रथम भारतीय क्रिकेट संघाच्या सर्वोत्तम कर्णधारांपैकी एक असलेल्या महेंद्रसिंग धोनी याला आमच्या टीम कडून वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आज भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार ‘हेलिकॉप्टर शॉट’ माही चा ४० वा वाढदिवस. सगळ्या भारतीयांचा लाडका असलेल्या धोनीवर आज शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. मात्र यावेळी त्याची बायको साक्षी मात्र वेगळ्याच पेचात अडकली आहे.

सध्या आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधील निवृत्तीनंतर धोनी तसा निवांत झाला आहे. सध्या तो फक्त आयपीएल मॅचेस खेळतो. पण को-रोना परिस्थितीमुळे आता या वर्षीच्या आयपीएल मॅचेस काही काळ स्थगित करण्यात आल्या आहेत. म्हणजेच धोनीकडे सध्या वेळच वेळ आहे. या मोकळ्या वेळेत सध्या धोनी जे काय करतोय त्यामुळे त्याची बायको साक्षी प्रचंड वैतागली आहे.

धोनी सध्या काय करतो हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडणं स्वाभाविक आहे. आणि त्याचं उत्तर आमच्याकडे आहे. भारतीय क्रिकेट टीमच्या या माजी कर्णधाराला व्हिडिओ गेम्स खेळणं मनापासून आवडतं. धोनीला सध्या पबजी या खेळाचा नाद लागला असून तासनतास तो हा व्हिडिओ गेम खेळत असल्याचे साक्षीने म्हटले आहे. क्रिकेटच्या मैदानावर जसे माही खेळाचे डावपेच आखत असतो, तसेच तो पबजी (आता बीजीएमआय) खेळताना आखतो असे साक्षीचे म्हणणे आहे.

हा गेम खेळात असताना माही स्वतःशीच बडबडत असल्याचेही धोनीची पत्नी साक्षी सांगते. कधी कधी तो आमच्याशी बोलत असल्यासारखे वाटते, पण खरं तर तो आपल्याच गेमच्या विश्वात संवाद साधत असतो. आता तर हा गेम आमच्या बेडरूमपर्यंत आला असल्याची तक्रार साक्षी करते. दिवसभर तर माही हा गेम खेळत बडबडत असतोच, पण झोपेतही तो याच खेळाबद्दल बोलत असतो. त्यामुळे साक्षी वैतागली आहे.

पण माहीचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो कितीही हा व्हिडिओ गेम खेळताना मग्न होत असला तरी मैदानावरची त्याची एकाग्रता कोणीही भंग करू शकत नाही. क्रिकेटच्या मैदानावर तो अजूनही बादशाहाच आहे.

सध्या तो व्हिडिओ गेम मध्ये व्यस्त असला तरी क्रिकेट हेच माहीचे पहिले प्रेम असल्याचे साक्षीने कबूल केले. त्यामुळे त्याची क्रिकेटवरील मक्तेदारी अजूनही तशीच आहे याची खात्री त्याच्या चाहत्यांना पटली आहे.

को-रोनामुळे आयपीएल २०२१ मध्यावरच थांबवण्यात आली असली तरी अजून दुसरा टप्पा सुरू होण्यास बराच वेळ आहे. दरम्यानचा काळ धोनी आपल्या कुटुंबासमवेत घालवण्यात बिझी आहे.

You might also like