एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मिस्टर इंडिया’ मधील छोटी टीना झाली मोठी! आता दिसते अशी…करतेय हे काम

पूर्वीच्या काळी खूप कमी असे चित्रपट होते, जे काहीतरी वेगळे विषय घेऊन बनत असत. चित्रपटांमध्ये होणारे प्रयोग हे आजच्या मानाने बरेच मर्यादित होते. असाच एक प्रयोग झाला १९८७ मध्ये. हा प्रयोग केवळ कॅमेरा ट्रिक मध्ये नव्हता, तर एकूणच इंडस्ट्री मध्ये होता.

बहुचर्चित ‘मिस्टर इंडिया’ हा चित्रपट त्या वर्षी प्रदर्शित झाला. त्यावेळी आता इतके तंत्रज्ञान प्रगत नव्हते. एवढे असूनही हा चित्रपट बनला आणि त्याने बरीच वाहवा देखील मिळवली. भारताचा सुपरहिरो म्हणून ‘मिस्टर इंडिया’ लोकप्रिय झाला.

अनाथ मुलांबरोबर राहणारा एक तरुण आणि त्याला त्रास देणारे काही लोक यांच्या भोवती ‘मिस्टर इंडिया’ या चित्रपटाचे कथानक फिरते. या तरुणाला त्याच्या मृत वैज्ञानिक वडिलांकडून एक जादुई घड्याळ मिळते. हे घड्याळ घालणारा माणूस इतरांना दिसू शकत नाही. घड्याळ घालताच तो गायब होतो. हे घड्याळ मिळताच तो तरुण त्याला आणि त्या मुलांना त्रास देणाऱ्या खलनायकाला धडा शिकवतो. अशी साधारण या चित्रपटाची कथा आहे.

चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर कपूर यांनी केले होते. चित्रपटात प्रमुख भूमिकेत अनिल कपूर आणि श्रीदेवी हे कलाकार होते, तर खलनायकाची भूमिका अमरीश पुरी यांनी साकारली होती. त्यांचा ‘मोगॅम्बो खुश हुआ’ हा डायलॉग बराच गाजला. या चित्रपटात अनाथ मुलांचे काम करणारे बालकलाकार काही मोठे होऊन याच क्षेत्रात काम करू लागले, तर काहींनी वेगळे मार्ग निवडले. आफताब शिवदासानी आणि अहमद खान यांनी हिंदी मनोरंजन सृष्टीत आपले करिअर सुरू ठेवले.

‘मिस्टर इंडिया’ मध्ये काम करणारी अजून एक बालकलाकार आहे जिने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते. तिला या चित्रपटात असे अनेक सीन देण्यात आले ज्यामुळे तिला बघताना प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आले होते. या चित्रपटात तिने ‘टीना’ नावाच्या अनाथ मुलीची भूमिका केली होती. हुजान खुदाई असे या बालकलाकाराचे नाव आहे. या चित्रपटाच्या वेळी ती केवळ ६ वर्षांची होती.

तिला या चित्रपटानंतर अनेक चित्रपटांच्या ऑफर आल्या, पण तिला अभिनय क्षेत्रात करिअर करायचे नसल्याने तिने त्या सगळ्या ऑफर नाकारल्या. आता ती एका जाहिरात कंपनी मध्ये काम करते. एका मुलाखतीत तिने सांगितले, की तिच्या वडिलांचा मित्र कास्टिंग डिरेक्टर होता म्हणून तिची निवड या रोल साठी करण्यात आली.

 

You might also like