एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

कधी मुंबईच्या चाळीत राहणार हा मुलगा आज आहे एक प्रसिद्ध अभिनेता, आता एक चित्रपटासाठी घेतो इतके पैसे, नाव जाणून आश्चर्य वाटेल..

आपण सर्वानी सिने जगात “विक्की कौशल ” हे नाव कधी तर ऐकलेच असले. आज तो एक बॉलिवूडमधील प्रसिद्ध व उत्कृष्ट अभिनेता आहे. त्याने त्याचा अभिनयाने लोकांचा मनावरती राज्य केले आहे. त्याने अनेक चित्रपटामध्ये इतकी दमदार भूमिका केली आहे कि, तो ज्या भूमिकेत असतो तो ती भूमिका स्वतः जगतो असे आपणास प्रत्यक्षात वाटते.

१९९८ मुंबईच्या चाळीमध्ये मध्ये जन्मलेल्या विकीने मोठे झाल्यानंतर स्वतःच्या मेहनतीने बॉलीवूड आपले नाव केले आहे. विकीचे वडील बॉलिवूड चित्रपटामध्ये स्टंटमन चे काम करत होते. त्यांनी अकॅशन डायरेक्टर काम सुद्धा केले होते. त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीबद्दल आधीपासूनच माहिती होते.

विकीला खेळण्यात आणि अभ्य्सात खूप रस होता. विशेष म्हणजे विकीने इंजिनिअरिंग केले आहे. मुंबईमधील राजीव गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजि मधून त्याने आपले शिक्षण घेतले आहे. व्यवसायाने तो इलेक्ट्रॉनिक आणि टेलिकॉमिनिकेशन इंजिनिअर आहे. पण या सर्व कामामध्ये मन लागत नसल्याने त्यांनी किशोर नमित कुमार अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला.

विकी अनेकदा आपल्या वडिलांसोबत फिलिमी शूटिंग सेट वार्त जात असत, २०१० मध्ये त्याने अनुराग कश्यप यांच्या “गंग्स ऑफ वासेपुर” या चित्रपटामध्ये असिस्टंट म्हणून काम केले.या चित्रपटाचे सहायक दिग्दर्शक असलेल्या नीरज घयावन यांनी विकीला मसान या चित्रपटाच्या औडिशन साठी बोलावले. त्याचा दमदार अभिनय पाहून त्याला या चित्रपटामध्ये काम देण्यात आले. या चित्रपटांमध्ये तो प्रथमच नायकाच्या भूमिकेत दिसणार होता. या चित्रपटामुळे त्याला बरीच प्रसिद्धी मिळाली.

चित्रपटाच्या बेस्ट डेब्यु साठी त्याला IIFA अवार्ड ने सन्मानित केले गेले आहे. जुबान , राघव 2.0 , राजी आणि संजू असे सुपरहिट चित्रपट मध्ये त्यांनी आता आपली भूमिका केली आहे. विकीचा २०१९ मध्ये रिलीज झालेला उरी : द स र्जि क ल स्ट्रा ई क या चित्रपटाने देशभरामध्ये नाव कमवले आहे. या चित्रपटाने १०० कोटीची कमाई हि केली आहे. या चित्रपटानंतर विकीला आता अनेक बड्या चित्रपटाच्या ऑफर्स हि येऊ लागल्या आहे.

त्याच्या वैयक्तिक जीवनशैली बद्दल बोललो तर त्याला खाण्याची तसेच बाहेर फिरण्याची खूप आवड आहे. तो आता चित्रपटामध्ये काम करण्यासाठी ३ कोटी इतके मानधन घेतो. अलीकडच्या काळात विक्की आणि हरलीन सेठी एकमेकांना डे ट करत होते पण काही कारणांमुळे ते वेगळे झाले. मुंबईच्या चाळीपासून ते बॉलिवूडचा अभिनेता पर्यंतचा त्याचा हा प्रवास खूप ख ड स र होता. आपल्या परिश्रम आणि अभिनयाच्या जोरावरती त्याने आज आपले नाव एक प्रासिद्ध अभिनेता म्हणून केले आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like