एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आई कुठे…’ च्या सेटवर लावली या बालकलाकाराने हजेरी! १४ वर्षांनी भेटला…

स्टार प्रवाह वाहिनी वरील ‘आई कुठे काय करते’ या मालिकेने सर्व प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. या मालिकेतील कलाकार सेटवर चाललेल्या गमतीजमती सोशल मीडिया वरून शेअर करतच असतात. त्यांची धमाल मस्ती आपल्याला त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंट वर पाहायला मिळतेच. नुकताच या मालिकेतील अनिरुद्ध म्हणजे अभिनेता मिलिंद गवळी यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक फोटो शेअर केला. या फोटोविषयी बरीच चर्चा सुरू आहे.

मिलिंद गवळी यांनी शेअर केलेला हा फोटो आहे त्यांच्या एका चित्रपटातील बालकलाकाराचा. २००८ मध्ये ‘कालभैरव’ हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. या चित्रपटात अभिनेते मिलिंद गवळी प्रमुख भूमिकेत होते.

या चित्रपटात त्यांना दोन मुले दाखवली आहेत. मोठी मुलगी व लहान मुलगा. या लहान मुलाची भूमिका साकारली होती समर्थ नावाच्या एका मुलाने. त्यावेळी तो अवघा काही महिन्यांचाच होता. मिलिंद गवळी यांच्याबरोबर फोटोमध्ये असलेला हाच तो मुलगा. मिलिंद यांनी या फोटोबरोबर चित्रपटाच्या सेटवरचा एक किस्सा देखील शेअर केला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Milind Gawali (@milindgawali)

या चित्रपटात एकदा हा लहान मुलगा नागाच्या अगदी जवळ गेलेला दाखवण्यात आला आहे. या चित्रीकरणावेळी समर्थचे आईवडील देखील तिथे उपस्थित होते. मिलिंद गवळी यांनी त्यांना विचारले, की त्यांना आपल्या इतक्या लहान मुलाला नागाजवळ पाठवायला भी’ती वाटत नाही का? तर त्यांनी उत्तर दिलं, की ते दोघेही सर्पमित्र असून तो नाग त्याला काही करणार नाही याची त्यांना खात्री आहे. झालेही तसेच. समर्थने नागाला स्पर्श केल्यावरसुद्धा नागाने समर्थला काहीच केले नाही.

‘आई कुठे काय करते’ मध्ये नीलिमाचे पात्र साकारणाऱ्या अभिनेत्री शीतल क्षीरसागर यांचा समर्थ हा नातेवाईक लागतो. त्याने मिलिंद गवळी यांना भेटायची इच्छा व्यक्त करताच शीतल यांनी या दोघांची ‘आई कुठे…’ च्या सेटवर भेट घालून दिली.

जवळपास १४-१५ वर्षांनी हे दोघे भेटले आहेत. या भेटीची उत्सुकता मिलिंद गवळी यांनी आपल्या या पोस्ट मध्ये नमूद केली आहे. आपल्याला समर्थला भेटून खूप आनंद झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी समर्थचे ‘कालभैरव’ चित्रपटातील काही फोटो शेअर करत आपला आणि त्याचा सेटवरचा फोटोदेखील शेअर केला आहे. या भेटीने ‘कालभैरव’ चित्रपटाच्या आठवणी ताज्या झाल्या, असेही मिलिंद गवळी यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिले आहे.

You might also like