एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘नटसम्राट’ मध्ये आप्पा बेलवलकरांच्या पत्नीची भूमिका साकारली होती या अभिनेत्रीने खऱ्या आयुष्यात दिसते खूपच सुंदर..

चित्रपटांमध्ये कलाकाराला रंगभूषा करणे गरजेचे असते. एखादी विशेष भूमिका साकारायची असेल तर त्यासाठीसुद्धा त्या भूमिकेला साजेशा पद्धतीचा मेकअप करावा लागतो. आपल्याकडे रंगभूषा किंवा मेकअप चा वापर हा चित्रपटांमध्ये हमखास केलेला पाहायला मिळतो.

अशा वेळी मात्र फार गंमत होते. कारण एखादा कलाकार खऱ्या आयुष्यात वेगळा दिसत असतो आणि विशेष भूमिकेसाठी केलेल्या रंगभूषेमुळे आपल्याला वेगळाच दिसतो. मग एकाचवेळी त्या कलाकाराचे दोन्ही फोटो समोर धरले तर आपल्याला त्यावर विश्वास बसत नाही. आज आपण अशाच एका अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत.

शेक्सपियरने अनेक शोकांतिका लिहिल्या. त्याच्याच शोकांतिकेच्या प्रेरणेवरून शिरवाडकरांनी “नटसम्राट” नाटक रंगभूमीवर आणलं. या नाटकातील आप्पा बेलवलकरांच्या भुमिकेने आणि एकुणच नाटकाने सुद्धा इतिहास रचला. याचवरून काही वर्षांपूर्वी “नटसम्राट” हा सिनेमा तयार झाला.

“नटसम्राट” हे नाटक प्रेक्षकांनी जितंक उचलून धरलं तितक्याच तोलामोलानं “नटसम्राट” हा सिनेमाही रूपेरी पडद्यावर प्रचंड गाजला. याच सिनेमामध्ये आप्पा बेलवलकरांच्या पत्नीची भूमिका अत्यंत प्रभावी पणे निभावणाऱ्या कलाकाराचे नाव म्हणजे मेधा मांजरेकर होय.

भूमिका कोणतीही असो अत्यंत कलाकुसरपणे निभावण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. याच कसबीच्या जोरावर आजवर मेधा मांजरेकर यांनी बऱ्याच भूमिका यशस्वीपणे पार पाडून रसिकांची मने जिंकली आहेत. पडद्यावरील आणि खऱ्या आयुष्यातील त्यांच्या लुकवर बरेच चाहते पसंती दर्शवत असतात.

नटसम्राट मध्येही त्यांच्या लुकने कमाल केली होती. त्यांच्या खऱ्या आयुष्यातल्या लुकपेक्षा कितीतरी पटींनी वेगळा लुक त्यांचा होता. एका हतबल कलाकाराच्या बायकोची भूमिका अर्थात आप्पा बेलवलकरांच्या बायकोची भूमिका त्यांनी केली होती.

मेधा मांजरेकर या मराठी इंडस्ट्रीतील डॅशिंग, यशस्वी दिग्दर्शक, अभिनेते असलेले महेश मांजरेकर यांची पत्नी आहे. या दोघांची जोडी मराठी चित्रपटसृष्टीतील खास जोड्यांपैकी एक जोडी आहे. या दोघांनी एका चित्रपटात एकत्र कामही केलं आहे. तो “बंध नायलाॅनचे” हा चित्रपट होता.

 

View this post on Instagram

 

A post shared by Medha M Manjrekar (@manjrekarmedha)

पडद्यावरील आणि पडद्यामागील सुध्दा यांची केमिस्ट्री जबरदस्त राहिलेली आहे. मेधा आणि महेश या दोघांचीही ओळख एका प्रोजेक्टमुळे झाली होती. ती भेट साधारण वीस वर्षापूर्वीची होती. त्यावेळी महेश मांजरेकर हे दिग्दर्शक म्हणून मेधा मांजरेकर यांना मिळाले होते.

अगदी मेधा मांजरेकर यांना पाहताक्षणी महेश मांजरेकरांना त्यांच्याशी प्रेम जडलं होतं. अर्थात नंतर काही काळ एकमेकांसोबत व्यतित केल्यानंतर ते दोघेही लग्न बंधनात अडकले. या दोघांची खूप प्रेमळ अशी लव्ह स्टोरी आहे. मेधा आणि महेश यांची सई मांजरेकर ही मुलगी आहे.

ही सुद्धा अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. तिने तिचा डेब्यु बाॅलिवुडमधून केला होता. दबंग खान सलमान याच्या “दबंग ३” हा तिचा पहिला वहिला चित्रपट ठरला. गौरी इंगवले नावाची त्यांची दुसरी लेकही आहे. मेधा आणि महेश मांजरेकर यांच्याकडे यशस्वी जोडी म्हणूनही पाहिले जाते.

मराठी चित्रपटसृष्टीत मेधा मांजरेकर यांनी अनेक चित्रपट केले आहेत. यामध्ये “कोकणस्थ” , “काकस्पर्श”. “बंध नायलाॅनचे”, “फन अनलिमिटेड” , “दे धक्का”, “फक्त लढ म्हणा” या आणि अशा बऱ्याच सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यांचे पती असणाऱ्या महेश मांजरेकर यांनी “मी शिवाजीराजे भोसले बोलतोय” सारखा सुपरहिट चित्रपट दिला. त्याचसोबत “नटसम्राट” , “काकस्पर्श” असे अनेक चित्रपट दिग्दर्शित ही केले. महेश मांजरेकरांनी मराठीसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतही आपला ठसा उमटवला आहे.

You might also like