एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘पापा कहते हैं’ चित्रपटामधील या अभिनेत्री मध्ये आता झाला आहे खूपच बदल, बॉलिवूड सोडून आता करते नोकरी..

९० च्या दशकात आलेला चित्रपट ‘पापा कहते हैं’ जर तुम्ही पाहिला असेल तर तुम्हाला त्या चित्रपटाची अभिनेत्री मयूरी कांगो नक्कीच आठवत असेल. बॉलिवूड इंडस्ट्री मध्ये बऱ्याच दिवसापासून या अभिनेत्रीला पाहिले गेले नाही. आता ना ती कोणत्याही टीव्ही कार्यक्रमात दिसली आहे, ना कोणत्याही चित्रपटात काम करताना दिसली आहे. यापूर्वी, ती २००० मध्ये तेलगू चित्रपट ‘वामसी’ मध्ये अंतिम वेळी दिसली होती. मग त्यानंतर ती कुठेच दिसली नाही.

तिने नसीम, पापा कहते हैं, होगी प्यार की जीत या सारख्या सुपर हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. तिने बर्‍याच टीव्ही मालिकांमध्ये देखील काम केले होते पण आता ती या क्षेत्रापासून दूर गेली आहे. ती आता कोणत्या चित्रपट आणि टीव्ही मालिका मध्ये दिसत नाही. आज आम्ही तुम्हाला तिच्याबद्दल आणि ती सध्या काय करत आहे याबद्दल सांगणार आहे.

२००३ मध्ये मयुरी कॉंगोला चित्रपट आणि मालिकांमध्ये विशेष यश न मिळाल्यामुळे तिने एनआरआय आदित्य ढिल्लनशी लग्न केले. लग्नानंतर मयुरीने आपल्या पतीबरोबर अमेरिकेत राहायला सुरुवात केली आणि यासह तिने अमेरिकेतून मार्केटींग आणि फायनान्स या विषयात एमबीएची डिग्री प्राप्त केली. यानंतर तिने अमेरिकेत आपले काम करायला सुरुवात केली. नंतर पुन्हा तिने भारतात राहायला सुरुवात केली कारण तिचा सासरा भारतात राहतो म्हणून ती आपल्या मुलासह भारतातच राहते.

मयुरी जेव्हा इयत्ता १२वीत शिकत होती, तेव्हा तिला ‘नसीम’ चित्रपटात अभिनय करण्याची संधी मिळाली आणि तिचा अभिनय पाहून तिला दिग्दर्शक महेश भट्ट यांनी त्यांचा ‘पापा कहता है’ चित्रपटासाठी निवडले आणि त्यानंतर तो चित्रपट हिट ठरला. आणि त्यानंतर तिने पापा कहते हैं, होगी प्यार की जीत, बेताबी, बादल, जंग सारखे अनेक चित्रपट दिले. आता मयुरी आई झाली आहे आणि तिला एक ६ वर्षाचा मुलगा आहे, ज्याचे नाव कियान आहे.

तर मित्रांनो कसा वाटला आमचा हा लेख, आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

 

 

You might also like