एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

अभिनंदन! बार्शीच्या मयूर फरताडे या २१ वर्षीय तरुणाने शोधला इंस्टाग्रामचा बग, फेसबुकने दिले २२ लाखाचे बक्षिस..

आजकाल सोशल मीडियाच्या काळामध्ये अनेक कंपन्या समोर येत आहेत. फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर सारखे मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सध्या खूप चर्चेत आहेत. परंतु या सोशल मीडिया अँप मधील एक त्रुटी बार्शी सोलापूर मधील मयूरने इंस्टाग्रामच्या लक्षात आणून दिली आहे. यावर खुश होऊन फेसबुकने त्यास २२ लाखाचे बक्षिस हि दिले आहे. 

सोलापूर बार्शी मधील २१ वर्षी मयूर फरताडे या तरुणाने इंस्टाग्राम मधील एक उणीव समोर आणली आहे. कोणालाही न फॉलो करता स्टोरी, रिल्स, IGTV टीव्ही तो पाहू शकत होता. मयूर  सध्या कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत असून तो c, c++, पायथॉन या सारख्या संगणकीय भाषांमध्ये महारत आहे.

असा केला इन्स्टा बगचा खुलासा-
मयूरने १६ एप्रिल रोजी  फेसबूकचा बिग बाऊंटी प्रोग्रॅमवेळी या गोष्टीचा खु’लासा केला होता. यावरती प्रतिक्रिया देत फेसबुकने १९ एप्रिलला मयूरला संपर्क केला आणि त्याचे आभार मानले. मयूरच्या माहितीनुसार, फेसबुकने इन्स्टाग्राममध्ये सर्व आवश्यक बदल केले.

१२ जून रोजी फेसबुकने मयूरला त्याच्या कामगिरीबद्दल २२ लाख रुपये बक्षिसे म्हणून दिले. मयूरच्या या कामामुळे बर्‍याच वापरकर्त्यांचा डेटा आता सेफ झाला आहे. या महत्त्वपूर्ण दुरुस्तीबद्दल फेसबुकने मयूरचे आभार मानले आहेत.

घरामध्ये विद्यार्थ्यांनी आपला वेळ कसा घालवायचा याचे एक उत्तम उदाहरण मयूरने सर्वाना दिले आहे. त्यांच्या या अभिनयाने केवळ त्यांचे कुटुंब आणि विद्यापीठाचेच नाव नाही तर जागतिक माहिती तंत्रज्ञानाच्या पडद्यावर आपल्या देशाचेही नाव उंचावले आहे.

सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहरात राहणारा मयूर हा संगणक शास्त्राचा विद्यार्थी आणि शिवाजी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य कै. मधुकर फरताडे यांचा पुतण्या आहे. या बक्षीसाने त्याचे पालक आनंदित झाले आहेत. त्याचे पालक म्हणतात की त्यांच्या मुलाचे यश आमच्यासाठी समाधानाचे आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला आम्हला कंमेंट करून नक्की कळवा, तसेच आमचे फेसबुक पेज हि लाईक करायला विसरू नका. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like