एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मायराचा मेकअप आणि प्रार्थनाचं सिक्रेट! मेकअप रूम मधला दोघींचा व्हिडिओ व्हायरल…

झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिका प्रेक्षकांना वेगवेगळ्या कारणांसाठी आवडून गेली आहे. या मालिकेतील प्रमुख कलाकार प्रार्थना बेहरे आणि श्रेयस तळपदे हे तर मालिकेचे प्रमुख आकर्षण आहेतच. यातील अजून एक कलाकार लोकांना फार आवडून गेली आहे. ती आहे छोटीशी परी. मायरा वायकुळ या बालकलाकाराने साकारलेली ही गोड भूमिका सगळ्यांनाच भावली आहे. ऑनस्क्रीन जसे हे कलाकार सगळ्या प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात, तसेच ते ऑफस्क्रीन देखील मस्ती करताना दिसतात.

विशेषतः श्रेयस तळपदे, प्रार्थना बेहरे आणि मायरा वायकुळ हे सेट वर देखील बरीच मस्ती करत असल्याचे त्यांनी बऱ्याचदा मुलाखतींमध्ये सांगितलं आहे. हे तिघेही आपले विनोदी व्हिडिओज् बनवून सोशल मीडिया वर अपलोड करत असतात. त्यांच्या या व्हिडिओज् ना हजारोंनी लाईक्स असतात. तसेच लोक खूपदा त्यावर कमेंट्सही करतात. सध्या प्रार्थना आणि मायराचा असाच एक धमाल व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे.

हा व्हिडिओ प्रार्थनाने ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेच्या सेट वरील मेकअप रूम मध्ये शूट केला आहे. यामध्ये आपण मायराला मेकअप करताना पाहू शकतो. तिने साडी नेसली असून ती ब्लश-ऑन लावत आहे. मात्र ती जे लावत आहे त्याचे तिला नाव माहीत नाही. ती त्याला ‘पावडर’ म्हणते. मात्र त्यावेळी प्रार्थना तिला त्याचे नाव सांगते. प्रार्थनाने तिला ‘तू हे का लावत आहेस?’ असे विचारले असता मायराने खूप निरागसपणे ‘कारण की मग ते ग्लिटर ग्लिटर दिसतं’ असं उत्तर दिलं.

मग प्रार्थना तिला ‘तुला लिपस्टिक कोणी लावून दिली?’ असे विचारते. त्यावेळी मायरा प्रार्थनाकडे हात करते. ‘तू लिपस्टिक लावली का असं तिला कुणी विचारलं तर तू काय सांगणार?’ असं प्रार्थनानं तिला विचारलं. त्यावेळी नखरेलपणा करत मायराने उत्तर दिलं, “माझे असेच ओठ आहेत.” त्यावर हसत प्रार्थनाने ‘आपलं हे सिक्रेट कुणाला सांगायचं नाही’ असं मायराला सांगितलं. या दोघींचा हा व्हिडिओ बघताना खूपच मजा येते. दोघीसुद्धा या व्हिडिओ मध्ये खूप गोड दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Prarthana 💜 (@prarthana.behere)

ऑनस्क्रीन मायलेकीची भूमिका करणाऱ्या प्रार्थना आणि मायरा ऑफस्क्रीन सुद्धा एकमेकींच्या मैत्रिणी झाल्या आहेत. त्यामुळे दोघींचीही ऑफस्क्रीन भरपूर धमाल आणि मजा मस्ती सुरू असलेली बघायला मिळते. प्रार्थना नेहमीच या दोघींचे भन्नाट व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करताना दिसते.

You might also like