एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘आहे परी तर डोन्ट वरी’ प्रेक्षकांना भावतोय मायराचा निरागसपणा…

झी मराठी वाहिनी वरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ ही मालिका विविध कारणांसाठी प्रेक्षकांची आवडती मालिका बनली आहे. अभिनेता श्रेयस तळपदे आणि अभिनेत्री प्रार्थना बेहरे या दोघांना पुन्हा छोट्या पडद्यावर पाहून त्यांच्या चाहत्यांना खूपच आनंद झाला आहे. ही फ्रेश जोडी लोकांना आवडू लागली आहे. मालिकेतील इतर व्यक्तिरेखा आणि त्या साकारणारे कलाकार देखील प्रेक्षकांचे फेवरेट बनले आहेत. मात्र या मालिकेचे विशेष आकर्षण आहे ती छोटी परी.

परीची ही भूमिका साकारली आहे बालकलाकार मायरा वायकुळ ने. पदार्पणातच मायराने प्रेक्षकांना आपलेसे करून घेतले आहे. तिचा निरागस अभिनय प्रेक्षकांना भावतो आहे. आपल्या गोड बोलण्यामुळे परी सगळ्याच प्रेक्षकांना आपली वाटते. तुम्हाला माहीत आहे का, की छोट्या पडद्यावर एंट्री करण्याआधीच मायरा एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व आहे? तिचे स्वतःचे इंस्टाग्राम अकाऊंट आणि युट्यूब चॅनेल आहे. आपल्या या सोशल मीडिया अकाऊंट्स वरून मायरा आपले वेगवेगळे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायराचा स्वतःचा असा चाहतावर्ग आहे. ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेमुळे तिची लोकप्रियता अजून वाढली आहे. तिचे गोड आणि निरागस फोटो आणि व्हिडिओ पाहून कुणालाही ती आवडून जाईल. मालिकेतील तिची भूमिका लोकांना खूपच आवडली आहे. तिला पाहिल्यावर ही तिची पहिलीच मालिका आहे असे वाटणारच नाही, इतका तिचा अभिनय नैसर्गिक वाटतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Shweta G Vaikul (@shwetavaikul)

२६ सप्टेंबर ला झालेल्या जागतिक कन्या दिवसाच्या निमित्ताने मालिकेतील माय-लेकीची जोडी म्हणजेच नेहा आणि परीचं देखील फोटोशूट करण्यात आलं. प्रार्थना आणि मायरा या दोघींनीही पांढरा टी-शर्ट आणि जीन्स परिधान केली होती. दोघींच्याही टी-शर्ट वर ‘अपने पास बहोत पैसा है’ असं वाक्य आहे. दोघीही या फोटोंमध्ये खूप गोड दिसत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Myra Vaikul (@_world_of_myra_official)

मायराचे सोशल मीडिया वर खूप फॉलोवर्स आहेत. मायराच्या फोटो आणि व्हिडिओ ला खूप लाईक्स मिळतात. त्यावर तिचे चाहते नेहमी कमेंट्स देखील करत असतात. ‘खूप क्यूट’, ‘किती गोड!’, ‘निरागस’ अशा कमेंट्स तर नेहमीच तिच्या फोटोंवर येत असतात. तिचे विनोदी व्हिडिओ तर खूपच व्हायरल होतात. मंडळी, तुम्हाला देखील मायरा आवडते का? तिचा परी म्हणून अभिनय तुम्हाला कसा वाटतो? मायराच्या निरागसपणाबद्दल तुमचे काय मत आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. तसेच आमचे तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like