एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

“कमवतो किती?” असा प्रश्न विचारणारी मायरा एका भागामधून कमावते इतके पैसे…

झी मराठी वाहिनीने सध्या नव्या मालिकांचा मौसम सुरू केला आहे. त्यातलीच एक मालिका म्हणजे ‘माझी तुझी रेशीमगाठ’. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात या मालिकेने आपले स्थान पक्के करून टाकले आहे. या मालिकेच्या प्रोमोनेच मुळात प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला होता. छोट्या परीच्या “कमवतो किती?” या प्रश्नाने अनेकांचे डोळे मोठे झाले. चला तर मग आज जाणून घेऊया, की या मालिकेत काम करणारा प्रत्येक कलाकार ‘कमवतो किती’ ते…

शीतल क्षीरसागर
यशच्या काकीची भूमिका साकारणारी अभिनेत्री शीतल क्षीरसागर या मालिकेच्या एका भागासाठी २० हजार रुपये इतके मानधन घेत असल्याचे बोलले जात आहे. या मालिकेतही शीतलने नकारात्मक भूमिका साकारली आहे. ४१ वर्षीय या अभिनेत्रीने या आधीही अनेक मालिकांमध्ये नकारात्मक भूमिका साकारल्या आहेत.

संकर्षण कऱ्हाडे
आपल्या जुळ्या मुलांच्या जन्मानंतर संकर्षण कऱ्हाडेने खऱ्या आयुष्यात बापाच्या भूमिकेत प्रवेश केला आहे. मालिकेत तो समीर चौधरी ही भूमिका साकारतो आहे. समीर हा यशचा मित्र घेतला आहे. मालिकेच्या एका भागासाठी ३२ वर्षीय संकर्षण २८ हजार रुपयांचे मानधन स्वीकारत आहे.

श्रेयस तळपदे
मालिकेतील मुख्य नायकाची भूमिका अभिनेता श्रेयस तळपदे साकारत आहे. या व्यक्तिरेखेचे नाव आहे यश उर्फ यशवर्धन चौधरी. श्रेयसने आपली अभिनय कारकीर्द छोट्या पडद्यापासूनच सुरू केली होती. आता या मालिकेद्वारे तो छोट्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. ४५ वर्षांचा हा तरुण मालिकेतील आपल्या भूमिकेसाठी एका भागासाठी ३८ हजार रुपयांचे मानधन घेत आहे.

प्रार्थना बेहरे
नेहा कामत ही मालिकेच्या मुख्य नायिकेची भूमिका अभिनेत्री प्रार्थना बेहरे साकारत आहे. प्रार्थनाने देखील आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासूनच केली होती. या मालिकेद्वारे तीही पुनरागमन करत आहे. प्रार्थना सध्या २८ वर्षांची आहे. तिला मालिकेच्या प्रत्येक भागासाठी ३२ हजार रुपये मानधन देण्यात येते.

मायरा वायकुळ
नेहा कामतच्या मुलीची म्हणजेच परीची भूमिका मालिकेत बालकलाकार मायरा वायकुळ ने निभावली आहे. या मालिकेद्वारे मायरा अभिनय क्षेत्रात पदार्पण करत आहे. तिच्या निरागसपणाचे हजारो फॉलोवर्स आहेत. मायरा इंस्टाग्राम स्टार म्हणून प्रसिद्ध आहे. केवळ ४ वर्षांच्या या गोड मुलीने सर्वांची मने जिंकून घेतली आहेत. श्रेयस तळपदेला प्रोमोमध्ये ‘कमवतो किती?’ असे विचारणाऱ्या मायराला या मालिकेच्या एका भागासाठी १० हजार रुपये इतके मानधन दिले जाते.

You might also like