एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘…नाहीतर मालिका बंद करा!’ प्रेक्षकांचा संताप होतोय अनावर…

‘येऊ कशी तशी मी नांदायला’ मालिकेवर सध्या प्रेक्षक प्रचंड नाराज झालेले दिसत आहेत. यातली ओम आणि स्वीटूची जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. अनेक अडथळे पार करत अखेर स्वीटू आणि ओमचे लग्न होणार होते. लग्नाआधीचे विधी अत्यंत थाटामाटात साजरे करण्यात आले होते. साखरपुडा, मेहंदी, हळद हे कार्यक्रम अगदी थाटात पार पडले. मात्र ऐन लग्नाच्या वेळी झालेला घोळ आणि त्याची झालेली परिणीती बघता प्रेक्षकांचा संताप होणे साहजिक आहे.

ओमने खूप कष्टाने नलू मावशीचे मन जिंकले. अखेर ओम आणि स्वीटूचे प्रेम जिंकले असे वाटत होते. लग्नाची तारीख ठरली, लग्नाआधीचे विधीही झाले. प्रेक्षकांना अखेर त्या क्षणाची उत्सुकता लागून राहिलेली. कधी एकदा या दोघांचे लग्न होते, यासाठी प्रेक्षकवर्ग आसुसला होता. या स्पेशल क्षणांसाठी रविवारी २३ ऑगस्ट रोजी चक्क दोन तासांचा महाएपिसोड देखील ठेवण्यात आला होता. अर्थात ओमची बहीण मालविका शेवटपर्यंत या लग्नात मोडता घालायचा प्रयत्न करतच असते.

अचानक मांडवातून स्वीटूचे बाबा गायब होतात आणि दस्तुरखुद्द नवरदेव म्हणजेच ओम लग्न सोडून त्यांना शोधायला बाहेर पडतो. कोणालाही न सांगता गेलेला ओम बाकी मंडळी तिथे उपस्थित असतानाही फक्त स्वीटूशी संपर्क साधायचा प्रयत्न करतो, जो शेवटपर्यंत होत नाही. इकडे ओमची वाट बघून बघून मालविका आणि मोहित ओम पळून गेला अशी आवई उठवतात आणि स्वीटूला मोहितशी लग्न करण्याशिवाय कसा पर्याय नाहीये, हे तिला पटवून देण्यात यशस्वी होतात. अखेरीस स्वीटू आणि मोहितचे लग्न पार पडते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Marathi Memes for Babdya Teens (@shitmarathiserialsshow)

या सगळ्यामध्ये स्वीटूचे लग्न झाले तरी नवरीचा बाप मांडवात नाही, ही गोष्ट कुणाच्याच कशी लक्षात येत नाही? ओमने इतर कोणाला कॉल का केला नाही? यांसारखे प्रश्न झाल्या प्रकाराने उपस्थित होत आहेत. प्रचंड उत्सुकता वाढवून प्रेक्षकांची अशी फसवणूक केली जाते, असे काही नेटकऱ्यांनी म्हटले आहे. झालेला प्रकार प्रचंड हास्यास्पद असून मीमर्सनी या मालिकेला यामुळे आपले लक्ष्य केले आहे. प्रेक्षकांच्या प्रेमाचं माहीत नाही, पण गेल्या काही दिवसांपासून या मालिकेवर मीम्सचा पाऊस पडतो आहे.

या सगळ्या गोष्टींवर प्रेक्षकांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. या सगळ्यामुळे मालिकेला प्रेक्षकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहेच, पण मीमर्सनी देखील या मालिकेला खूप ट्रोल केलं आहे. ‘किती नशा करून तुम्ही मालिका लिहिता?’, ‘हा निव्वळ फालतूपणा आहे, प्रेक्षकांना मूर्ख समजून तुम्ही काहीही दाखवता’, ‘दाखवायचं म्हणून काहीही वाढवताय, त्यापेक्षा मालिका बंद करा’ अशा कमेंट्स करत प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

You might also like