एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेतील टोण्या वास्तविक जीवनामध्ये आहे असा, पहा विरलची खऱ्या आयुष्यातली धमाल-मस्ती..

सध्या झी मराठी वर सुरू असलेली ‘देवमाणूस’ ही मालिका त्यातल्या रहस्यांमुळे प्रेक्षकांना खुर्चीला खिळवून ठेवण्यात यशस्वी झाली आहे. या यशाचे श्रेय मालिकेचे कथानक आणि कलाकारांचे खुसखुशीत संवाद यांना जाते. या मालिकेतले कलाकार जेवढे रंग त्यांच्या भूमिकांमध्ये भरतात, तेवढीच धमाल ते सेटवरही करतात.

सरू आजी, डिंपल आणि टोन्या ही या मालिकेतील काही गाजलेली पात्रं. यापैकी शुभंकर बाबू पाटील अर्थात टोन्या ही व्यक्तिरेखा साकारणारा बालकलाकार विरल माने सध्या त्याच्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय होत आहे. मालिकेतला हा शाळकरी मुलगा जेवढा मालिकेमध्ये मस्तीखोर दिसतो आहे तेवढाच तो खऱ्या आयुष्यातही खूपच गमतीशीर आहे.

मालिकेमध्ये सहज वावरणारा विरल सेटवरही तेवढ्याच खेळीमेळीने वागत असतो. विरल सर्वांशीच खूप मिळून-मिसळून वागतो. पण त्याची सर्वांत जास्त धमाल चालते ती डिंपल म्हणजेच अभिनेत्री अस्मिता देशमुख बरोबर. मालिकेमध्ये बहीण-भावासारखे नाते असलेले डिंपल आणि टोन्या सेटवरही तितक्याच मनमोकळेपणाने वागतात.

त्याच्या सहज सुंदर अभिनयामुळे ‘देवमाणूस’ ही त्याची पहिलीच मालिका आहे यावर बऱ्याच जणांचा सांगूनदेखील विश्वास बसत नाही. त्यामुळे टोन्या ही व्यक्तिरेखा जितका या मालिकेचा अविभाज्य भाग आहे, तितकीच ‘देवमाणूस’ ची विरलच्या आयुष्यातील भूमिकाही तेवढीच मोलाची आहे.

तर अशा या टोन्याला खऱ्या आयुष्यात अभिनयाबरोबरच नृत्याचीदेखील खूप आवड आहे. सध्या त्याचे व्हायरल होणारे डान्स व्हिडिओ त्याच्यात असलेल्या मोकळेपणाची झलक दाखवून जातात. त्याच्या स्वभावातला बिनधास्तपणा त्याच्या नृत्यातूनही पाहायला मिळतो.

मूळचा साताऱ्याचा असलेला विरल घरी त्याच्या आई, वडील आणि बहिणीबरोबर राहतो. काही दिवसांपूर्वी ‘देवमाणूस’ च्या टीमने विरलचा वाढदिवस सेटवर दणक्यात साजरा केला होता. त्यावेळी त्याचे आई-बाबादेखील उपस्थित होते. वाढदिवसाचे धमाल व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत आणि विरलच्या चाहत्यांनाही ती मजा अनुभवता येत आहे.

सध्या श्वेता शिंदे निर्मित आणि राजू सावंत दिग्दर्शित ‘देवमाणूस’ ची सगळीच टीम चित्रीकरणात व्यस्त आहे. परंतु ऑगस्ट २०२० ला सुरू झालेली ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे असं वृत्तांकडून कळतंय. झी मराठी वर सुरू असलेली हे मालिका तुम्ही कधीही झी ५ ऍप वर बघू शकता.

‘झी मराठी उत्सव नात्यांचा’ पुरस्कार सोहळ्यामध्ये टोन्याला ‘सर्वोत्कृष्ट विनोदी पात्र’ असा पुरस्कार मिळाला. लहान वयातच विरलने स्वतःच्या अभिनयाने स्वतःचा असा चाहतावर्ग तयार केला आहे. टोन्याला प्रेक्षकांची अशीच पसंती मिळत राहो आणि विरलला त्याच्या आयुष्यात अनेकानेक संधी मिळोत, तसेच त्याच्या भावी वाटचालीसाठी टीम ‘सिने मराठी’ कडून मनःपूर्वक शुभेच्छा!

You might also like