एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘कमिंग सून…’ मानसी नाईक देणार का गोड बातमी?

सध्या मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार आपली पुढची पिढी घडवण्यात आणि वाढवण्यात व्यस्त आहेत, असे दिसते. अलीकडेच अनेक कलाकारांनी आपण आई किंवा बाबा झालो अशी गोड बातमी चाहत्यांना दिली आहे. त्यात आता आणखी एका कलाकाराची भर पडणार असं दिसतंय. एका अभिनेत्रीने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर एक फोटो शेअर करत आपण गरोदर असल्याची बातमी चाहत्यांना दिली आहे.

अभिनेत्री मानसी नाईकने आपल्या सोशल मीडिया अकाऊंट वर आपला फोटो शेअर केला आहे. यामध्ये तिचे पोट दिसत आहे. त्यामुळे ती गरोदर असल्याचे अनेक जण म्हणत आहेत. साडी, मंगळसूत्र आणि हातात हिरव्या बांगड्या अशा पेहरावात मानसीचा हा फोटो आहे. या पोस्टला तिने ‘कमिंग सून’ – ‘लवकरच’ अशी कॅप्शन देखील टाकली आहे. त्यामुळे चाहते आता तिच्या बाळाच्या प्रतीक्षेत आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

जानेवारी २०२१ मध्ये मानसीने बॉक्सर प्रदीप खरेरा बरोबर लग्नगाठ बांधली. छोट्या पडद्यावरील ‘चार दिवस सासूचे’ या सुप्रसिद्ध मालिकेतून ‘प्रियांका’ ची भूमिका करत मानसीने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. २००७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जबरदस्त’ या मराठी चित्रपटातून तिने मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यानंतर तिने टार्गेट (२०१०), तुक्या तुकविला नाग्या नाचविला (२०१०), कुटुंब (२०१२), तीन बायका फजिती ऐका (२०१२), मर्डर मेस्त्री (२०१५) अशा चित्रपटांमधून भूमिका निभावल्या.

मानसी एक उत्तम डान्सर देखील आहे. अनेक पुरस्कार सोहळ्यांमध्ये प्रेक्षकांनी तिला डान्स करताना पाहिलं आहे. तिची ‘बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ ही गाणी खूप लोकप्रिय झाली आहेत. आपल्या पतीबरोबर देखील ती काही डान्स व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत राहते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

मानसीने सोशल मीडिया वर आपल्या गरोदरपणाची अशी बातमी दिल्यानंतर अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे. मात्र बऱ्याच चाहत्यांनी ‘आम्हाला माहीत आहे, ही चेष्टा आहे ते’ अशाही कमेंट्स केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तर फारच गमतीदार प्रतिक्रिया दिल्या आहेत. ‘अरे आता हे कधी एवढं झालं लगेच…’ असे म्हणत मानसीने अचानक दिलेल्या या बातमीवर नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत. काही जणांनी मात्र तिच्या आगामी प्रोजेक्ट ची ही घोषणा असू शकते, असाही अंदाज बांधला आहे. येत्या काही दिवसांमध्ये कळेलच, की मानसी खरंच गरोदर आहे की ही तिच्या नव्या प्रोजेक्टची घोषणा आहे.

You might also like