एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘कैसा लगा?’ मानसी नाईक आणि तिच्या नवऱ्याच्या अवस्थेवर प्रेक्षकांचं प्रश्नचिन्ह…

आपल्या डान्सने सगळ्यांना प्रभावित करणारी मानसी नाईक नेहमीच चर्चेत असते. अलीकडेच तिने सोशल मीडिया वर बेबी बम्पचा फोटो शेअर केला आणि सगळेच चाहते प्रश्नसागरात बुडून गेले. अनेकांनी तिला यावर शुभेच्छा देखील दिल्या. मानसीचे लग्न जानेवारी २०२१ मध्ये बॉक्सर प्रदीप खरेरा बरोबर झालं. त्यानंतर लगेच नऊ महिन्यांत तिने हा फोटो शेअर केल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. मात्र नंतर तिने खुलासा करत हा तिच्या आगामी शॉर्टफिल्म मधील फोटो असल्याचं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

आता देखील ती तिच्या एका पोस्ट मुळे पुन्हा चर्चेत आली आहे. मानसी आपला नवरा प्रदीप बरोबर अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडिया वर शेअर करत राहते. या दोघांची जोडी चाहत्यांना फार आवडते. मानसीने नव्याने पोस्ट केलेला हा देखील असाच एक व्हिडिओ आहे. या व्हिडिओ मध्ये मानसी आणि प्रदीपला पाहून लोक मात्र ‘हे काय झालं?’ असा प्रश्न विचारू लागले आहेत.

व्हिडिओ च्या सुरुवातीला मानसी आणि प्रदीप दोघेही विचित्र अवस्थेत दिसत आहेत. त्यामुळे तिचे चाहते चिंतेत पडले आहेत. मात्र व्हिडिओ मध्ये पुढे पाहिल्यावर दोघेही खूप स्टनिंग दिसत आहेत. मानसीने या पोस्ट वर ‘कैसा लगा?’ अशी कॅप्शन टाकत चाहत्यांना तिचा हा व्हिडिओ कसा वाटला असं विचारलं आहे. दोघांच्या एकत्र फोटोशूटचे काही क्षण या व्हिडिओ मध्ये पुढे दिसत आहेत. दोघेही या फोटोशूटमध्ये खूप भारी दिसत आहेत. तसेच एकमेकांबरोबर ते खूप छान दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pardeep Kharera (@pardeepkharera1)

मानसीने अनेक मराठी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. कोकणस्थ, कुटुंब, तीन बायका फजिती ऐका, मर्डर मेस्त्री, जबरदस्त, हुतूतू, ढोलकी अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने भूमिका निभावल्या आहेत. तिचे डान्स परफॉर्मन्स तर अफलातून असतात. ‘वाट बघतोय रिक्षावाला’ आणि ‘बाई वाड्यावर या’ यांसारख्या गाण्यांमुळे तिच्या प्रसिद्धीत अजूनच भर पडली. सोशल मीडिया वर ती आपल्या आगामी प्रोजेक्ट्सची माहिती चाहत्यांना देत असते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manasi Naik Kharera (@manasinaik0302)

तर मित्रांनो, तुम्हाला हा मानसी आणि प्रदीप खरेरा चा व्हिडिओ आवडला का? मानसीचे कोणते चित्रपट तुम्हाला आवडतात? तसेच मानसीचा कोणता डान्स परफॉर्मन्स तुम्हाला सर्वांत जास्त आवडला आहे? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला आमचे आवडलेले लेख जरूर लाईक करा. तसेच तुम्हाला आवडलेले लेख आपल्या मित्रमंडळींबरोबर शेअर करायला विसरू नका.

You might also like