एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘माझ्याकडे फोटो, व्हिडिओ मागितले’ राज कुंद्रा अटक प्रकरणी मराठी अभिनेत्रीचा गौप्यस्फोट!

पो’र्नो’ग्रा’फी प्रकरणात राज कुंद्राला अ’ट’क झाली आणि अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. अनेक गोष्टींचे खुलासे होऊ लागले. आपल्याला या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला, असा आ’रोप अनेक मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी केला आहे.

आपल्याला राजने पो’र्न इंडस्ट्रीत आणण्याचा प्रयत्न केला, असा आ’रोप या मॉडेल्स आणि अभिनेत्रींनी केला आहे. त्यात आता अजून एका मराठी अभिनेत्रीची भर पडली आहे. मनीषा केळकर असे या अभिनेत्रीचे नाव आहे.

मनीषा अभिनयाबरोबरच सूत्रसंचालनही करते. मनीषाला आपण यांचा काही नेम नाही (२००७), भोळा शंकर (२००८), लॉटरी (२००९), मिशन पॉसिबल (२०१०), वंशवेल (२०१३), बंदूक (२०१३) यांसारख्या मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये पाहिले आहे. फ्रेंड रिक्वेस्ट (२०१६) या तेलगू चित्रपटातही मनीषाने काम केले आहे. तिने नुकताच तिला राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊस कडून ऑफर आल्याचा गौप्यस्फोट केला.

मनीषा केळकरने एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत या गोष्टीचा खुलासा केला आहे. राज कुंद्राच्या प्रॉडक्शन हाऊस कडून तिच्याकडे तिच्या फोटो आणि व्हिडिओ ची मागणी करण्यात आल्याचे तिने सांगितले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Manisha Kelkar (@manisharamkelkar)

“राज कुंद्राचं प्रॉडक्शन हाऊस असल्याने मला वाटलं नावाजलेलं प्रॉडक्शन हाऊस आहे. त्यामुळे मी त्यांना भेटले. यावेळी त्यांनी माझ्याकडे काही फोटोंची मागणी केली, तसंच काही व्हिडिओ शूट करणार असल्याचं ते म्हणाले.” मनीषा सांगत होती.

यावर मनीषाने राजच्या सहकाऱ्यांना काही प्रश्न विचारले. ‘या फोटोशूट आणि व्हिडिओ ची काही थीम किंवा कथा आहे का?’ अशी विचारणा मनीषाने केली असता तिला समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

त्यामुळे तिने ही ऑफर नाकारल्याचे सांगितले. केवळ एका वेबसाईटवर आपले फोटो आणि व्हिडिओ टाकले जाणार या कल्पनेनं मनीषाला विचार करायला भाग पाडले आणि तिने ही ऑफर नाकारली. त्यामुळे या प्रकरणात अडकण्यापासून ती वाचली.

या प्रकरणात संशय आल्याने मनीषाने थोडा शोध घेतला. ज्या नंबरवरून कॉल आला होता त्या नंबरचा मनीषाने शोध घेतला. हा नंबर नायजेरियाचा असल्याचे तिच्या लक्षात आल्याचे तिने मुलाखतीत सांगितले.

अशा प्रकारणांपासून दूर राहण्यासाठी सतर्क राहणं गरजेचं असल्याचं ती म्हणाली. “आपला मोबाईल कुणाला देऊ नका. पासवर्ड कुणाला देऊ नका. कारण, काहीही होऊ शकतं.” असंही मनीषा पुढे म्हणाली. आपण नेहमी आपल्या बाबतीत सावधगिरी बाळगली पाहिजे, असं मनीषानं आपल्या मुलाखतीत सांगितलं.

You might also like