एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मनिके मागे हिते’ गाण्याची भुरळ पडली राणू मंडलला! व्हिडिओ होतोय सोशल मीडिया वर व्हायरल..

सध्या सोशल मीडिया वर ‘मनिके मागे हिते’ या गाण्याने धुमाकूळ घातला आहे. प्रत्येक जण या गाण्यावर आपला व्हिडिओ बनवून सोशल मीडिया वर अपलोड करू लागला आहे. अनेक सेलिब्रेटींनाही या गाण्याची भुरळ पडली आहे. त्यांचे देखील या गाण्यावरचे व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. अशातच विस्मरणात गेलेली एक व्यक्ती या गाण्यामुळे पुन्हा चर्चेत आली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ranu Mondal (@ranu.mondal.official)

अलीकडेच राणू मंडलचा एक व्हिडिओ सोशल मीडिया वर व्हायरल होताना दिसत आहे. यात तिने ‘मनिके मागे हिते’ हे गाणं गायलं आहे. युट्यूब वर हा व्हिडिओ व्हायरल होताना दिसत आहे. आतापर्यंत या व्हिडिओ ला २४ लाख लोकांनी पाहिले आहे. लाल टी-शर्ट घातलेल्या राणू मंडलने हे गाणे काहीसे स्वतःच्याच अंदाजात गायलेले दिसत आहे. एका युट्यूबरने (Rondhoy Porichoy) हा व्हिडिओ आपल्या चॅनेल वर अपलोड केला आहे.

‘मनिके मागे हिते’ हे गाणं मूळचं श्रीलंका देशातील आहे. स्वाहिली भाषेत हे गाणं गायलं गेलं आहे. हे गाणे मूळ सतीशन रथनायका चे आहे. मात्र २०२१ मध्ये श्रीलंकन गायिका योहानी बरोबर त्याने हे गाणे पुन्हा गायले. त्यामुळे या गाण्याला बरीच प्रसिद्धी मिळाली. चमथ संगीतने या गाण्याची निर्मिती केली आहे. अनेक म्युझिक चार्ट्स वर हे गाणे सध्या टॉप ला आहे. जगभरात प्रसिद्धी मिळालेले हे पहिले श्रीलंकन गाणे आहे.

राणू मंडलच्या बाबतीत बोलायचे झाले, तर राणू सध्या आपले पूर्वीचे हलाखीचे दिवस पुन्हा जगत आहे. दोन वर्षांपूर्वी पश्चिम बंगाल मधील राणाघाट रेल्वेस्थानकावर ती लता मंगेशकर यांचे सुप्रसिद्ध ‘एक प्यार का नगमा है’ हे गाणं गाताना दिसली होती. बॉलिवूडचा प्रसिद्ध संगीतकार हिमेश रेशमियाने तिला आपल्याबरोबर एक गाणे गाण्याची संधी दिली आणि रातोरात राणू प्रसिद्ध झाली.

सोशल मीडिया वर व्हायरल झालेल्या राणूच्या या गाण्यामुळे तिला अनेक रिऍलिटी शो मध्ये गेस्ट म्हणून बोलावले गेले. अनेक प्रसारमाध्यमांनी तिच्या मुलाखती घेतल्या. मात्र संगीतसृष्टीत तिला इतर कोणतेही काम मिळाले नाही. सध्या राणूजवळचे सगळे पैसे संपले असून ती पुन्हा आपले कष्टप्रद जीवन कंठत आहे. राणूने मोठे घरही घेतले होते. तसेच तिची मुलगी देखील तिच्याकडे परत आली होती. मात्र तिच्याजवळचे पैसे संपल्यावर तिच्या मुलीनेही तिला दूर केले. मध्यंतरी झालेल्या लॉकडाऊनमुळे राणूला रिऍलिटी शो मध्ये बोलावणे देखील बंद झाले होते. पैशांअभावी राणू पुन्हा हलाखीत जगत आहे.

You might also like