एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘मन उडु उडु झालं’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला! मालिकेत हृता दुर्गुळे सोबत दिसणार ‘हा’ अभिनेता…

झी मराठी वाहिनी वरील काही मालिका लवकरच वाहिनीवरून उडून जाणार आहेत आणि त्याजागी काही नवीन मालिका प्रेक्षकांना भेटायला येणार आहेत. त्यातलीच एक मालिका आहे ‘मन उडु उडु झालं’. ‘मन उडु उडु झालं’ ही मालिका झी मराठी वर ३० ऑगस्ट पासून संध्याकाळी ७:३० वाजता प्रसारीत होणार आहे.

मालिकेचा प्रोमो नुकताच रिलीज करण्यात आला. केवळ प्रोमो पाहूनच प्रेक्षकांचं मन उडु उडु व्हायला लागलंय. प्रोमोला उदंड प्रतिसाद मिळालेला पाहता प्रेक्षकांना मालिकादेखील नक्कीच आवडेल असे दिसते.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

‘मन उडु उडु झालं’ या मालिकेत अभिनेत्री हृता दुर्गुळे आपल्या भेटीला येत आहे. हृता दुर्गुळे हा तसा मराठी टीव्ही प्रेक्षकांना माहीत असलेला चेहरा. हृताचे चाहते तिला पुन्हा मालिकेत पाहून खूष झाले आहेत. प्रेक्षकांना तिचा अभिनय पुन्हा पाहण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Hruta (@hruta12)

त्याचबरोबर त्यांना अजून एका गोष्टीची उत्सुकता आहे. हृता बरोबर ‘मन उडु उडु झालं’ मालिकेत दिसणारा हँडसम चेहरा नक्की आहे तरी कोण, हे जाणून घेण्याबाबत प्रेक्षक भलतेच उत्सुक दिसत आहेत.

हृता दुर्गुळे बरोबर ‘मन उडु उडु झालं’ मालिकेत दिसणारा नवा चेहरा आहे अजिंक्य राऊत चा. झी मराठीच्या प्रेक्षकवर्गासाठी हा चेहरा नवीन असला तरी मराठी इंडस्ट्री साठी हा चेहरा ओळखीचा आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Ajinkya Raut (@ajinkyathoughts)

महेश कोठारे यांच्या ‘विठू माऊली’ या मालिकेतून अजिंक्यने छोट्या पडद्यावरचा आपला प्रवास सुरू केला. या मालिकेत विठुरायाची मध्यवर्ती भूमिका त्याने साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अजिंक्यने ‘टकाटक २’ या चित्रपटातदेखील भूमिका साकारली आहे.

झी मराठीचा हा नवा चेहरा मूळचा परभणीचा आहे. परभणीवरून मुंबईत येऊन अजिंक्य मॉडेलिंग मध्ये आपले नशीब आजमावत होता. कर्मधर्मसंयोगाने त्याला ‘विठू माऊली’ मालिकेत काम करण्याची संधी मिळाली आणि त्याने या संधीचं सोनं केलं.

अजिंक्यने आपल्या भाषेवर काम करत प्रभुत्व मिळवलं. आपल्या लूक्स मध्ये देखील त्याने बदल केला. दरम्यान मधल्या काळात त्याने नृत्यावर लक्ष केंद्रीत करत आपल्या पदलालित्यावर काम केलं. अजिंक्यच्या या सगळ्या मेहनतीचं फळ त्याला मिळताना दिसत आहे.

प्रेक्षक हृता आणि अजिंक्यच्या जोडीला किती पसंत करतात हे मालिका सुरू झाल्यावर कळेलच. दरम्यान ‘मन उडु उडु झालं’ मालिकेमुळे ‘पाहिले न मी तुला’ ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. नव्या कथानकासह नव्या जोडीला घेऊन सुरू होणारी मन उडु उडु झालं’ ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होवो, हीच सदिच्छा!

You might also like