एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मलायकाला लागली नव्या पाहुण्याची चाहूल? ‘मला मुलगी असावी असे वाटते…’

मलायका अरोरा बऱ्याच गोष्टींमुळे चर्चेत असते. पती अरबाज खानबरोबर झालेला तिचा घट’स्फो’ट असो किंवा अभिनेता अर्जुन कपूर बरोबरचं अ’फे’यर असो, मलायका नेहमीच चर्चेत राहिली आहे.

मलायका तिच्या फिटनेस आणि फॅशनसाठी प्रसिद्ध आहे. बॉलिवूडमधील लोकप्रिय जोडी म्हणून ओळखले जाणारे मलायका आणि अरबाज यांनी जेव्हा घट’स्फो’ट घेतला तेव्हा सामान्य प्रेक्षकांसह संबंध बॉलिवूडला ध’क्का बसला होता. अरबाज आणि मलायकाला अरहान नावाचा मुलगा आहे.

मलायका नेहमीच सांगते की या जगात तिचे तिच्या मुलावर सर्वांत जास्त प्रेम आहे. तरीदेखील तिला आपल्याला एक मुलगी असावी असे वाटते. आपला मुलगा अरहान सोबत कुणीतरी असावे म्हणून मलायकाला नेहमीच एका बाळाला द’त्तक घ्यायची इच्छा होती. या बाळाला एक चांगलं आयुष्य मिळेल आणि एका चांगल्या कटुंबात ते वाढू शकले, असे ती म्हणाली.

एका मुलाखतीत मलायकाने सांगितले, की “माझ्या अनेक मित्रांनी मुलांना द’त्तक घेतले आहे आणि मुले तुमच्या आयुष्यात आनंद आणतात हे खरोखरच चांगले आहे.”

मलायका पुढे म्हणाली, “आम्ही अरहानसोबत खूप बोललो. आपण एखादी मुलगी द’त्तक घ्यावी, तिला कुटुंब आणि घर द्यावे… आम्ही बऱ्याच गोष्टींवर बोलतो, पण अजून काही ठरवले नाही.” मलायकाला नेहमीच एका मुलीची आई व्हायचे होते. “मी मुलींनी भरलेल्या कुटुंबातून आले आहे.

आणि आता फॅमिलीमध्ये सर्वांना मुलेच आहेत. मला एक बहीण आहे. आम्ही एकमेकांसोबत इतक्या मनमोकळेपणाने वागतो, की आम्ही प्रत्येक गोष्ट शेअर करतो आणि एकमेकींना आधारही देतो. मला मुलगी असती, तर मी तिला तयार केले असते आणि तिच्याबरोबर त्या सर्व गोष्टी केल्या असत्या ज्या आई आणि मुलगी करतात.”

करीना कपूरच्या चॅट शो मध्ये बोलताना मलायका आपला मुलगा अरहान बद्दल बोलली. अरबाज बरोबर घट’स्फो’ट झाल्यावर मुलाची त्यावर काय प्रतिक्रिया होती, याबद्दल देखील तिने सांगितले. “मला माझ्या मुलाला आनंदी वातावरणात पाहायचे आहे, गढूळ झालेल्या वातावरणात नाही” असेही ती म्हणाली. मलायका आता मुलीला जन्म देणार की मुलगी द’त्तक घेणार, याकडे तिचे चाहते डोळे लावून बसले आहेत. मलायका ही गुडन्यूज कधी देणार, याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.

आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल जाणून घेण्यासाठी आमचे लेख वाचत चला. आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

You might also like