एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हातात हात घालून फिरताना स्पॉट झाले मलायका आणि अर्जुन! पण टी-शर्ट पाहून नेटकरी म्हणाले…

आधी आपल्या नात्याबद्दल त्यांनी आळीमिळी गूपचिळी पाळली. आता मात्र ‘खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनों’ असे भासवत हे दोघे फिरताना दिसत असतात. आमच्या चाणाक्ष वाचकांनी आम्ही कुणाबद्दल बोलत आहोत, हे तर ओळखलेच असेल. हो, आम्ही बोलत आहोत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर बद्दल. पहिल्यांदा जेव्हा यांच्या नात्याच्या चर्चा सुरू झाल्या तेव्हा या दोघांनी अर्थातच त्यावर काहीही प्रतिक्रिया दिली नव्हती. नंतर मात्र सोशल मीडिया वर ते एकमेकांसोबतचे फोटो उघडपणे शेअर करू लागले.

Third party image reference

अलीकडेच या दोघांचा एक व्हिडिओ खूप व्हायरल होताना दिसत आहे. यामध्ये दोघेही हातात हात घालून एका रेस्टॉरंट मधून बाहेर येताना दिसत आहेत. या दोघांना पाहून चाहत्यांनी बाहेर गर्दी केली होती. चाहते अर्थातच त्यांचे फोटो आणि व्हिडिओ घेण्यात व्यस्त होते. मात्र अर्जुन आणि मलायकाला आपला खासगी वेळ जगजाहीर करण्यात फारसा रस असल्याचे दिसले नाही. बाहेर चाहत्यांची गर्दी पाहताच अर्जुनने मलायकाला त्यांच्यापासून वाचवत गाडीपर्यंत नेले आणि दार उघडून गाडीत बसवले. मग तो स्वतःही गाडीत जाऊन बसला आणि गाडी निघून गेली.

यावेळी मलायकाने पांढरा शर्ट आणि ब्लू डेनिम घातली होती. त्यावर तिने पांढऱ्या रंगाचे चप्पल घातले होते. अर्जुन कपूर मात्र ऑल ब्लॅक लूक मध्ये दिसून आला. त्याने ब्लॅक टी-शर्ट घातला होता. या टी-शर्टने नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले. त्याच्या टी-शर्ट वर ‘Wasted Youth’ असे शब्द लिहिले होते. ‘वाया गेलेलं तारुण्य’ असा त्याचा अर्थ होतो. त्याच्या या टी-शर्ट मुळे अर्जुन कपूर सोशल मीडिया वर ट्रो’ल होताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Bollywood Pap (@bollywoodpap)

मलायका अरोराने १९९८ मध्ये अभिनेता अरबाज खान बरोबर लग्न केले होते. मात्र २०१७ साली त्यांनी घट’स्फो’ट घेतला. या दोघांना एक मुलगाही आहे. या घट’स्फो’टाच्या आधीच मलायका आणि अर्जुन कपूरच्या नात्याबद्लच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. पहिल्यांदा जरी या दोघांनी आपले नाते लपवण्याचा प्रयत्न केला असला, तरी नंतर ते आपल्या नात्याबद्दल बरेच ओपन असल्याचे दिसले.

अलीकडेच अर्जुन कपूरचा ‘भू’त पुलिस’ हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सैफ अली खान, जॅकलिन फर्नांडिस आणि यामी गौतम देखील आहेत. सध्या अर्जुन त्याचा आगामी चित्रपट ‘एक व्हि’लन २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहे.

You might also like