एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘धडाकेबाज’ चित्रपटातील ‘कवठ्यामहांकाळ’ विषयी ३० वर्षांनंतर महेश कोठारे यांनी यांनी सांगितले मोठे रहस्य

मित्रांनो नमस्कार, आधीच्या काळातील मराठी सिनेचित्रपट क्षेत्रात एकाहून एक सुपरहिट चित्रपट बनले त्या काळात बनवाबनवी असो किव्हा मग माहेरची साडी ह्या कथेच लेखन अगदी लोकांच्या मनाला भिडणारा असायचा, अश्यात खूप साऱ्या चांगल्या कलाकारांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला.

आज आम्ही अश्याच एका चित्रपटाबद्दल बोलणार आहोत तो चित्रपट म्हणजे ‘धडाकेबाज’ १ जानेवारी १९९० साली रिलीज झालेली महेश कोठारे दिग्दर्शित फिल्म धडाकेबाजत्या काळात खुप गाजली.

ह्या चित्रपटाचा कथानक एका जादुई दुनियेतल्या अलाद्दीन सारखा आहे, अभिनेता लक्ष्मीकांत बेर्डे यासारख्या हुबेहूब दिसणारा माणूस बाटलीत बंद असतो, पण ह्यातही एक मज्जा आहे ती म्हणजे आणि ज्याला बाटली मिळते तो पण लक्ष्याच आहे.

त्यामुळे ह्या चित्रपटात आपल्याला लक्ष्या डबल भूमिकेत दिसेल. पण ह्या चित्रपटातील दोस्ती तुटायची नाय हे गाणं प्रेक्षकांच्या आजदेखील चांगलाच लक्षात आहे. ह्या चित्रपटात खूप सारे मोठे स्टार कास्ट होते जसेकी लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, रवींद्र बेर्डे, अश्विनी भावे, अल्का इनामदार असे भरपूर अन्य मोठे कलाकार होते.

पण ह्या चित्रपटाची खासियत जी आजपर्यंत कोणालाच माहीत नाही आहे ती तुम्हला आम्ही आज सांगणार आहोत, धडाकेबाज चित्रपटात डाकूची भूमिका साकारणार कवठ्यामहांकाळ याच त्या कवठेमहांकाळ गावाशी काय आहे कनेक्शन?

तुम्हाला माहीत असेल की महेश कोठारे यांची पाच अक्षरी असलेली मालिका महाराष्ट्राने डोक्यावर घेतली. २००० च्या मागील काळात लक्ष्मीकांत बेर्डे आणि महेश कोठारे ह्या सगळ्यांच्या आवडत्या जोडीने सगळीकडे धु मा कू ळ घातला होता, याच गाजलेल्या चित्रपटापैकी एक होता धडाकेबाज.

बाटलीत बंद असणारा लक्ष्या सारखा उभेहुभ दिसणारा आणि त्याचबरोबर धडाकेबाज लक्ष्या व ह्यातील त्या प्रसिद्ध गाण्यामुळे हा चित्रपट खखूप चालला. पण त्यातील कवठ्यामहाकाळ ह्याने प्रेक्षकांच्या मनावर असा घाव घातला की तो आजपर्यंत लोकांना चांगलाच ठाऊक आहे त्यासारखी आवाज काढून हसवणारे खूप व्हिडिओ नेटवर तुम्हाला पहायला मिळतील.

पण ह्या चित्रपटातील ह्या खलनायकाचे नाव सांगली जिल्ह्यातील एका गावावरून ठेवले होते, खरं तर हा किस्सा महेश कोठारे यांनी एका मराठी वाहिनीवर मुलाखती दरम्यान सांगितलं होता.त्यांच्या ५ अक्षरी चित्रपटातील खलनायकाची नावे कशी हटके असतात, टकलू हैवान गॅंग, तात्या विंचू अशी नावे लोकांच्या आजही तोंडात आहेत. महेश कोठारे म्हणाले की सांगली जिल्ह्यात जात असताना कवठेमहांकाळ गाव लागले आणि त्यावरून थोडा विचार करून धडाकेबाज चित्रपटातील खलनायकाच्या नावाचा खऱ्या अर्थाने जन्म झाला.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला smartmarathi8390@gmail.com या इमेलवर संपर्क करा.

You might also like