एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

ऑनस्क्रीन तरुण, ऑफस्क्रीन म्हातारे! मेकअपने लपवतात हे कलाकार आपले वय..

चित्रपटांमध्ये काम करणारी कलाकार मंडळी वर्षानुवर्षे त्याच वयाचे दिसतात. चित्रपटांव्यतिरिक्त देखील जेव्हा जेव्हा ही मंडळी कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा नेहमी तरुण दिसतात. ही सगळी मेकअपची कमाल आहे. मात्र मेकअप शिवाय या कलाकारांना पाहिले तर लक्षात येते की प्रत्यक्षात हे तर खूपच म्हातारे दिसतात. चला तर, अशा काही पडद्यावर तरुण दिसणाऱ्या पण प्रत्यक्षात तरुण नसणाऱ्या अभिनेत्यांबद्दल जाणून घेऊया.

१. रजनीकांत
१२ डिसेंबर १९५० ला जन्म झालेले रजनीकांत हे व्यक्तिमत्व पडद्यावर कधीच म्हातारं होत नाही. मराठी आणि कन्नड भाषेत लहानपण घालवलेल्या रजनीकांत यांनी के. बालचंदर या दिग्दर्शकाच्या सांगण्यावरून तमिळ शिकत तमिळ फिल्म इंडस्ट्री मध्ये प्रवेश केला. १९७५ ला त्यांचा पहिला तमिळ चित्रपट प्रदर्शित झाला. रजनीकांत यांनी बऱ्याच हिंदी चित्रपटांमध्येदेखील काम केले आहे.

२. शाहरुख खान
बॉलिवूडचा रोमान्स किंग म्हणून लोकप्रिय झालेला किंग खान म्हणजेच शाहरुख खान याचा जन्म २ नोव्हेंबर १९६५ ला झाला. १९८९ मध्ये ‘फौजी’ या टीव्ही मालिकेने शाहरुखच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. सुरुवातीला चित्रपटांमध्ये काम करण्यात रस नसलेला शाहरुख नंतर बॉलिवूडचा बादशहा म्हणून ओळखला जाऊ लागला.

३. सलमान खान
१९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बिवी हो तो ऐसी’ या चित्रपटातील सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेने सलमान खानच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात झाली. सलमानचा जन्म २७ डिसेंबर १९६५ रोजी झाला. ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटाने त्याला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. इतक्या वर्षांनंतरही सलमान चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारतो. त्याचे चित्रपट बॉक्स ऑफिस वर धमाल उडवून देतात.

४. अक्षय कुमार
बॉलिवूडच्या या खिलाडी कुमार चा जन्म ९ सप्टेंबर १९६७ रोजी झाला. त्याच्या ऍक्शन फिल्म्स नी अक्षय कुमारला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. सध्या अक्षय कुमार हे चित्रपट निर्मात्यांसाठी यशाच्या हुकुमाचे पण झाले आहे. १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सौगंध’ चित्रपटाने त्याने आपल्या फिल्मी कारकिर्दीला सुरुवात केली.

५. अजय देवगण
ऍक्शन हिरो म्हणून उदय पावलेला अजून एक अभिनेता म्हणजे अजय देवगण. अजयचा जन्म २ एप्रिल १९६९ रोजी झाला. पदार्पणातच त्याला ‘फूल और कांटे’ (१९९१) सारखा चित्रपट मिळाला आणि या चित्रपटाने त्याला उत्कृष्ट पदार्पणासाठी असलेला फिल्मफेअर पुरस्कार मिळवून दिला. अजयने आजवर शंभरहून अधिक चित्रपटांमध्ये कामे केली आहेत.

You might also like