एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

महाराष्ट्रात लवकरच होणार नवीन २२ जिल्ह्यांची निर्मिती! पहा तुमचे गाव आत्ता येते नेमके कोणत्या जिल्ह्यात..

मित्रानो तुमच्या शालेय दिवसात तुम्हाला शालेय प्रश्नांना भरपूर सामोरे जावे लागले असेल, तर मित्रानो आज आम्ही अश्याच एका गोष्टीवर बोलणार आहोत. चौथीच्या वर्गात असताना तुम्ही लोकांनी नक्कीच स्कॉलरशिप परीक्षेला सहभाग नोंदवला असेल, यात दरवेळी आपली बुद्धीमत्ता ओळखण्यासाठी आपल्याला महाराष्ट्रात किती जिल्हे आहेत असा प्रश्न विचारा गेला असेल ? तर याचे उत्तर आहे. ३६ जिल्हे! पण मित्रानो थांबा आत्ता ही संख्या लवकरच बदलणार असल्याची शक्यता दिसत आहे.

तर आत्ता मित्रानो राज्यात २२ नवीन जिल्हे आणि ४९ नवीन तालुके निर्मिती होण्याची संभावना आहे. तर मित्रानो आजच्या आमच्या लेखात तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी जाणून घेऊया कोणते नवीन जिल्हे निर्माण होणार आहे.

आज आपण त्याबद्दल सविस्तर बोलूयात. मित्रानो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र जी फडणवीस यांच्या कारकिर्दीत मुख्य सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली होती, ज्यात नव्या जिल्ह्याच्या मागणी बद्दल विचार पूर्वक अभ्यास केला होता.

वित्त महसूल नियोजन विभागाचे सचिव विविध पक्षांचे नेते आणि विभागीय आयुक्त या नव्या स्थापन केलेल्या समितीत होते. याच समितीत महाराष्ट्रात नवीन २२ जिल्हे आणि ४९ नविन तालुके याचा प्रस्ताव समिती समोर ठेवला होता. ते पुढील प्रमाणे…

नाशिक जिल्ह्या मधून मालेगाव व कळवण, ठाणे जिल्ह्यामधून मीरा-भाईंदर व कल्याण, बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव, यवतमाळ जिल्ह्यातील पुसद, अमरावती जिल्ह्यातून अचलपूर, भंडारा जिल्ह्यामधून चिमूर. आदी समावेश आहेत.

गडचिरोली जिल्ह्यामधून अहेरी, जळगाव जिल्ह्यामधून भुसावळ, लातूर जिल्ह्यामधून उदगीर, बीड जिल्ह्यामधून आंबेजोगाई, नांदेड जिल्ह्यामधून कीनवट, सातारा जिल्ह्यामधून मानदेश, पुणे जिल्ह्यामधून शिवनेरी, पालघर जिल्ह्यामधून जव्हार आदी समावेश आहेत.

रत्नागिरी जिल्ह्यामधून मानगड, रायगड जिल्ह्यामधून महाड, अहमदनगर जिल्ह्यामधून शिर्डी संगमनेर आणि श्रीरामपूर या सर्व नवीन जिल्ह्याचा त्यात समावेश होता. लवकरच हे नवीन जिल्हे अधिकृत घोषणा होत. लोकांसमोर येतील अशी अपेक्षा बाळगू.

तर मित्रानो आपण कोणत्या गावात राहता हे जाणून घ्याला आम्हाला नक्की आवडेल त्यासाठी आम्हला कमेंट्स द्वारे नक्की कळवा.

 

You might also like