एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

महागडी घड्याळ वापरणारी बॉलिवूड मधील यादी! शाहरुख पासून रणवीर सिंग पर्यंत हे अभिनेते वापरतात कोट्यवधी रुपयांची घड्याळे..

माणसाकडे पैसा आला की तो खूप सारी स्वप्न रंगवत असतो हव्या त्या गोष्टी पूर्ण करण्यासाठी तो लागेल तेवढी किंमत लावून ती वस्तू तो विकत आणत असतो, बॉलिवूड मधील कलाकारांना कोणतीही गोष्ट विकत घेण्यासाठी वेळ नाही लागत ते जितक मिळवतात त्याहून जास्त ते खर्च करणे यावर लक्ष्य देत असतात बॉलिवूड मधील खूप साऱ्या कलाकारांना खूप वेगवेगळे शोक चडले आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की बॉलिवूड मधील कलाकार जे हातात घड्याळ घालत असतात त्यांची किंमत ऐकून तुम्हाला विश्वास बसणार नाही.

शाहरुख खान
बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानला रोलेक्स घड्याळे खूप आवडतात. त्याच्याकडे रोलेक्सच्या तीन महागड्या अल्ट्रा प्रीमियम घड्याळांचा संग्रह आहे. त्याच्याकडे दोन रोलेक्स डेटोना ११६५२० घड्याळ आहेत, दोन्ही राखाडी रंगाच्या आहेत. पण दोघांच्या डायलचा रंग वेगळा आहे. या एका घड्याळाची किंमत ८.५१ लाख रुपये आहे. ही दोन दशकांपेक्षा जुनी अत्यंत दुर्मिळ घड्याळे आहेत. आज या दोघांची किंमत दुप्पट आहे. तर शाहरुखकडे तिसरे घड्याळ रोलेक्स कॉस्मोग्राफ डेटोना आहे. या घड्याळाची किंमत सध्या १०.६९ लाख रुपये आहे.

रणवीर सिंग
फुल एनर्जीने भरलेले अभिनेता म्हणजे रणवीर सिंग, रणवीर सिंग त्याच्या आकर्षित फॅशन सेन्ससाठी ओळखले जातात, रणवीर सिंगकडे फ्रँक मुलर व्ही ४५ व्हॅनगार्ड याचिंग रोझ गोल्ड आणि डायमंड घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत सुमारे ४० लाख रुपये एवढी आहे.

आदित्य रॉय
गुजारिश, जवानी-दीवानी, फितूर यांसारख्या चित्रपटांमध्ये काम करून प्रसिद्धी मिळवलेले अभिनेते आदित्य रॉय कपूरकडे रिचर्ड मिल आरएम ०२८ ऑटोमॅटिक रोज गोल्ड डायव्हर घड्याळ आहे. या घड्याळाची किंमत १.१२ कोटी रुपये आहे.

रणबीर कपूर
रणबीर कपूर देखील एक सुप्रसिद्ध अभिनेता आहे तो देखील त्यांच्या अभिनयासाठी खूप सुप्रसिद्ध आहे, रणबीर यांच्याकडे Audemars Piguet Roya हे घड्याळ आहे त्याची किंमत सुमारे १४ लाख रुपये आहे. त्याचबरोबर त्यांच्याकडे Ressence Type 1 नावाचे घड्याळ देखील आहे. ज्याची किंमत १४.१८ लाख आहे.

You might also like