एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

हे आहेत बॉलिवूडमधील सर्वात १० महागडे घट’स्फो’ट! पोटगी म्हणून द्यावे लागले कोट्यवधी रुपये..एकाने तर हप्त्याने दिले..

लग्न म्हटलं की त्याआधी नजरेसमोर येतो तो लग्नाचा खर्च. पण मंडळी, लग्न करण्यासाठी जसे पैसे लागतात तसे ते मोडण्यासाठी पण लागतात बरं का! आमिर खान आणि किरण रावच्या घट-स्फो-टानंतर या गोष्टींची चर्चा होऊ लागली. चला तर पाहूया या बॉलिवूड सेलिब्रेटींनी आपल्या घट-स्फो-टासाठी नक्की किती रक्कम मोजली ते..

१. हृतिक रोशन – सुझान खान
बॉलिवूडमधल्या सगळ्यात धक्कादायक घट-स्फो-टाची किंमत होती ३५० कोटी! हृतिककडे सुझानने पोटगी म्हणून तब्बल ४०० कोटी रुपयांची मागणी केली होती. अखेर ३५० कोटींवर सेटलमेंट झाली.

२. फरहान अख्तर – अधुना भाबानी
लग्नानंतर १६ वर्षांनी या दोघांनी घट-स्फो-ट घेतला. अधुना हेयर स्टायलिस्ट असून तिने पोटगी म्हणून फरहानचा जुहू येथील ७० कोटी रुपयांचा १०,००० स्क्वेअर फूटचा बंगला आपल्या नावे करून घेतला.

३. आदित्य चोप्रा – पायल खन्ना
आदित्य चोप्राने पायलशी घट-स्फो-ट घेण्यासाठी तिला पोटगी म्हणून ५० कोटी रुपये दिले होते. त्यानंतर त्याने राणी मुखर्जीशी लग्न केले.

४. आमिर खान – रीना दत्ता
१९८६ मध्ये पळून जाऊन लग्न केल्यानंतर आमिर खानने २००२ मध्ये रीना दत्ताशी घट-स्फो-ट घेतला. त्यावेळी त्याला पोटगी म्हणून रीनाला ५० कोटी रुपये द्यावे लागले होते.

५. संजय दत्त – रिया पिल्लई
मान्यता ही संजय दत्तची तिसरी बायको. त्याच्या दुसऱ्या बायकोपासून म्हणजेच रिया पिल्लईपासून घट-स्फो-ट घेताना त्याला रियाला एक बंगला आणि तीन महागड्या गाड्या पोटगी म्हणून द्याव्या लागल्या.

६. प्रभूदेवा – रामलथ
आपली पहिली पत्नी रामलथ हिच्यापासून घट-स्फो-ट घेताना प्रभूदेवाला तिला २५ कोटी रुपये आणि २ महागड्या गाड्या द्याव्या लागल्या होत्या.

७. मलायका अरोरा – अरबाज खान
आपला १८ वर्षांचा संसार मोडताना मलायकाने अरबाजकडून पोटगी म्हणून १५ कोटी रुपये घेतले होते.

८. करिश्मा कपूर – संजय कपूर
आपल्या ११ वर्षांच्या संसारानंतर जेव्हा करिश्माने वेगळं व्हायचा निर्णय घेतला तेव्हा संजय कपूरला तिला १४ कोटी रुपये पोटगीदाखल द्यावे लागले होते.

९. लिअँडर पेस – रिया पिल्लई
संजय दत्तशी घट-स्फो-ट घेतल्यानंतर रिया पिल्लईने लिअँडर पेसशी लग्न केले. पण दुर्दैवाने हेही लग्न फार काळ टिकू शकले नाही. वेगळे होताना लिअँडरला रियाला पोटगी म्हणून १० कोटी रुपये द्यावे लागले होते.

१०. सैफ अली खान – अमृता सिंग
अमृता सैफ पेक्षा १२ वर्षांनी मोठी होती. लग्नानंतर काही वर्षांनी दोघे वेगळे झाले. त्यावेळी सैफ ला अमृताला पोटगीदाखल ५ कोटी रुपये द्यावे लागले. मुलांच्या शिक्षणासाठी दरमहा १ लाख रुपये सैफला द्यावे लागत होते.

आमचा हा लेख तुम्हला कसा वाटला हे सांगायला विसरू नका. आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका.

नमस्कार वाचक मित्रांनो, वरील लेख हा इंटरनेटवर उपलब्ध माहितीवरून संदर्भ घेऊन लिहिण्यात आलेला आहे. या लेखामध्ये वापरलेले फोटो हे google.com वरून घेण्यात आलेले आहेत. जरी आपणास या लेखामध्ये कोणतेही कॉपीराईट कंटेंट आढळले असेल तर कृपया आम्हाला संपर्क करा.

 

You might also like