एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

माधुरीच्या मुलांना तुम्ही पाहिले आहे का? दोघेही दिसतात खूपच हॅण्डसम…

करोडो दिलांची धडकन असलेली ‘धक धक गर्ल’ माधुरी दीक्षित च्या अदांचे चाहते अनेक आहेत. तिचे मोहक सौंदर्य, दिलखेचक अदा, सुंदर नृत्य आणि अप्रतिम अभिनयाचे करोडो चाहते जगात आहेत. सध्या माधुरी फारशा चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी तिचे चाहते तिला सोशल मीडिया वर फॉलो करत तिच्याबद्दलचे अपडेट्स घेत असतात. माधुरी सोशल मीडिया वर सक्रीय आहे. आपल्या वेगवेगळ्या रेसिपीज आणि वर्कआऊटचे फोटो आणि व्हिडिओ ती नेहमी सोशल मीडिया वर अपलोड करत असते.

तिने आपला केवळ एक फोटो जरी सोशल मीडिया वर अपलोड केला तरी त्याला हजारोने लाईक्स आणि कमेंट्स असतात. बऱ्याच वेळा ती आपल्या कुटुंबाबरोबरचे देखील फोटो शेअर करत असते. माधुरीचा जन्म १५ मे १९६७ रोजी मुंबई मध्ये झाला. तिच्या वडिलांचे नाव शंकर दीक्षित असून आईचे नाव स्नेहलता दीक्षित आहे. माधुरीला दोन मोठ्या बहिणी आणि एक मोठा भाऊ आहे. वयाच्या तिसऱ्या वर्षी तिला नृत्याची आवड निर्माण झाली आणि पुढे ९ वर्षे तिने कथक प्रशिक्षण घेत त्यात प्राविण्य मिळवलं.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

माधुरीने १९८४ मध्ये राजश्री प्रॉडक्शनच्या ‘अबोध’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले. आजपर्यंत तिने ७० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. तिचे जरी सगळेच चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरले नसले तरी तिच्या सगळ्याच चित्रपटातील भूमिकांचे कौतुक झाले आहे. समीक्षकांनी देखील तिच्या भूमिकांचे वेळोवेळी कौतुक केले आहे.

आपली कारकीर्द जोमात असताना माधुरीने कॅलिफोर्नियाच्या सर्जन डॉ. श्रीराम नेने यांच्याशी १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लग्नगाठ बांधली. गंमत म्हणजे, लग्नाआधी श्रीराम नेने यांना त्यांची होणारी पत्नी ही हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आहे, ही गोष्टच माहीत नव्हती. अभिनय सोडून माधुरी संसाराला लागली आणि पतीबरोबर परदेशी स्थायिक झाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

१७ मार्च २००३ रोजी माधुरीने आपला पहिला मुलगा अरिन ला जन्म दिला. ८ मार्च २००५ रोजी तिच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजे रायन चा जन्म झाला. ऑक्टोबर २०११ मध्ये माधुरी आपल्या पतीसह भारतात परत आली आणि मुंबई मध्ये स्थायिक झाली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

तिची दोन्ही मुले मात्र अमेरिकेत राहून आपले शिक्षण पूर्ण करत आहेत. माधुरीने बऱ्याच वेळा आपल्या मुलांबरोबरचे फोटो सोशल मीडिया वर शेअर केले आहेत. तिची दोन्ही मुले खूपच आकर्षक आणि हॅण्डसम दिसतात.

You might also like