एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मालिकेत देवीसिंग ची होणार सुटका, पण या नव्या पात्राच्या एन्ट्री मुळे देवीसिंगला भरणार धडकी..

झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ मालिकेने आता नवीन वळण घेतले आहे. डॉ. अजितकुमार ला लग्नमंडपातून फरपटत बाहेर काढत त्याची वरात लग्नघरी न जाता तुरुंगात नेण्यात आली.

एसीपी दिव्या सिंगने अत्यंत कष्टाने अजितकुमार उर्फ देवीसिंग विरुद्ध एक एक पुरावे गोळा करत अखेर त्याला तुरुंगात डांबण्यात यश मिळवले. पण आता नवीन माहितीनुसार एसीपी दिव्या सिंग च्या मेहनतीवर पाणी पडणार असं दिसतंय.

अजितकुमार उर्फ देवीसिंग च्या अटकेनंतर प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोचली होती. कोर्टात सरकारी वकील आर्या देशमुख आपल्या परीने सर्व प्रयत्न करत देवीसिंग ला त्याच्या कर्माची शिक्षा मिळावी म्हणून प्रयत्न करत आहे.

मात्र कोणाच्याच प्रयत्नांना यश येताना दिसत नाहीये. देवीसिंग ची तुरुंगात राहूनही कटकारस्थाने सुरूच आहेत. त्याच्या विरुद्धचे पुरावे खोडून काढण्यात तो यशस्वी झाला आहे.

उलटतपासणीमध्ये चतुराईने उत्तर देत देवीसिंगने आपल्या सुटकेचा मार्ग मोकळा करून घेतला आहे. मालिकेच्या आगामी भागात पुराव्यांअभावी न्यायाधीश देवीसिंग ची सुटका करत असल्याचे चित्र आहे. मात्र त्याचवेळी खिडकीबाहेर उभ्या असलेल्या एका पात्रामुळे देवीसिंग ला धडकी भरते आणि तो भर कोर्टात भोवळ येऊन पडतो असे त्यामध्ये दाखवण्यात आले आहे. आता हे नवीन पात्र कोण आहे, तिचा आणि देवीसिंगचा नक्की काय संबंध आहे याचा उलगडा येणाऱ्या भागांमध्ये होईलच.

‘देवमाणूस’ मालिकेत सतत नवीन पात्रांची एन्ट्री होत असते आणि त्यामुळे कथेला एक वेगळेच वळण मिळते. मात्र या पात्राची एन्ट्री ही एकदम ढासू असून तिच्या केवळ दिसण्याने देवीसिंग वर त्याचा झालेला परिणाम आपण पाहिलाच आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ZeeMarathi (@zeemarathiofficial)

या ठसकेबाज पात्राची भूमिका निभावली आहे अभिनेत्री माधुरी पवार ने. माधुरीच्या येण्याने मालिकेत उत्सुकता ताणून धरणारा ट्विस्ट आला आहे. मालिका आता कोणते वळण घेणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by 𝐦𝐚𝐝𝐡𝐮𝐫𝐢 𝐩𝐚𝐰𝐚𝐫 (@madhuripawarofficial)

मित्रांनो, आपण माधुरी पवारला याआधी ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेत ‘वाहिनीसाहेब’ या व्यक्तिरेखेची भूमिका साकारताना पाहिले आहे. धनश्री काडगावकर ने काही कारणासाठी ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेला रामराम ठोकल्यावर ही भूमिका माधुरी पवार कडे आली.

माधुरीने स्वतःच्या शैलीने त्यात रंग भरत ती भूमिका अत्यंत बखुबीने पार पाडली. या अचानक पदरात पडलेल्या भूमिकेमुळे माधुरी घराघरांत जाऊन पोहोचली. आता तिची ‘देवमाणूस’ मधली भूमिका काय असेल, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे.

You might also like