एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

मुंबईतील या भागात आलिशान घरामध्ये राहते धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित, किंमत जाणून थक्क व्हाल..

वयाची पन्नाशी उलटून गेली तरी अजूनही तरुण दिसणारी आणि आपल्या मोहक अदांनी सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकवणारी अभिनेत्री म्हणजे ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित. आजही तिचे थिरकणारे पाय बघून तिच्यासमोर भलेभले गार होतात.

आज जरी ती फारशी चित्रपटांमध्ये दिसत नसली तरी आपल्या अभिनय सौंदर्याने तिने देखील एक काळ गाजवला आहे. आपल्या अभिजात सौंदर्याने आणि नैसर्गिक अभिनयाने तिने आपले असंख्य चाहते निर्माण केले आहेत.

१७ ऑक्टोबर १९९९ ला डॉ. श्रीराम नेने यांच्याबरोबर लग्न झाल्यानंतर माधुरी दीक्षित अमेरिकेला निघून गेली. २००३ मध्ये तिने आपल्या मोठ्या मुलाला म्हणजेच अरिन ला जन्म दिला. २००५ मध्ये तिच्या दुसऱ्या मुलाचा म्हणजे रेयान चा जन्म झाला. ऑक्टोबर २०११ मध्ये मात्र ती आपल्या कुटुंबासह भारतात परत आली. माधुरीकडे जवळपास २५० कोटी रुपयांची संपत्ती आहे. तिचा मुंबई मधील फ्लॅट हा त्यातीलच एक. तिचा हा फ्लॅट खूप आलिशान आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

आपल्या या आलिशान घराचे फोटो माधुरी बऱ्याचदा सोशल मीडिया वर शेअर करत असते. तिच्या घरात ती तिची आई, सासू, सासरे, पती आणि आपल्या दोन मुलांबरोबर राहते. माधुरीचे घर खूपच प्रशस्त आहे. आपल्या सर्व घरात तिने पांढरा आणि गोल्डन ब्राऊन अशा कॉम्बिनेशनचं फर्निचर बनवून घेतलं आहे.

या फर्निचर मुळे तिच्या घराला एक लॅव्हीश लूक मिळाला आहे. तिच्या लिव्हिंग रूम मध्ये तिने सर्वांसाठी कोझी चेअर्स घेतल्या आहेत. तिच्या लिव्हिंग रूम मध्ये एक प्रोजेक्टर देखील आहे. त्यामुळे सगळे जण टीव्ही वर विविध शो एन्जॉय करताना दिसतात.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Dr Shriram Nene (@drneneofficial)

माधुरीचं स्वतःचं क्लोझेट देखील आहे ज्यात ती आपले सगळे डिझायनर कपडे ठेवते. तिच्या ऍक्सेसरीज देखील याच क्लोझेट मध्ये असतात. तिच्या बेडरूम मध्ये एक आकर्षक पेंटींग आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Madhuri Dixit (@madhuridixitnene)

तिची स्वतःची पर्सनल जिम देखील आहे. माधुरी आपला वर्कआऊट कधीच चुकवत नाही. तिच्या किचन मध्ये देखील तिने पांढरा आणि गोल्डन ब्राऊन कॉम्बिनेशनचं फर्निचर बनवलं आहे. आपल्या या किचनमध्ये बनवलेल्या अनेक रेसिपीज ती सोशल मीडिया वर शेअर करत असते.

माधुरीच्या घरी सगळ्यांनाच नृत्य आणि संगीताची आवड आहे. त्यामुळे तिच्या घरी म्युझिक आणि डान्स रूम देखील आहे जिथे माधुरी आपला नृत्याचा रियाज करते. तिच्या घराला एक साजेसं टेरेसही आहे.

You might also like