एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

जर हा व्यक्ती नसता तर माधुरी दीक्षित नसती डॉक्टर राम नेनेची पत्नी! २० वर्षानंतर मोठा खुलासा..

बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षितचा अभिनय आणि सौंदर्य केवळ देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध आहे. माधुरीने तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत माधुरी दीक्षितने वयाच्या तिसऱ्या वर्षापासून कथ्थक शिकण्यास सुरुवात केली होती आणि वयाच्या ८ व्या वर्षी तिने पहिले परफॉर्मन्स दिले. करोडो हृदयावर राज्य करणाऱ्या माधुरी दीक्षित आज डॉ श्रीराम नेने यांच्या पत्नी आहेत.

माधुरी दीक्षित तिच्या कारकीर्दीच्या शिखरावर होती, जेव्हा अचानक तिने डॉ श्री राम नेने यांच्याशी लग्न करण्याचा निर्णय ऐकल्यावर चाहत्यांना ध’क्काच बसला होता. आज आम्ही तुम्हाला या खास प्रसंगी माधुरी दीक्षित आणि डॉ नेने यांच्या प्रेमकथेबद्दल सांगणार आहोत.

माधुरी दीक्षितने वयाच्या १७ व्या वर्षी राजश्रीच्या ‘अबोध’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. पण त्यांचा हा पहिला चित्रपट चालला नाही, मग त्यांनी पुन्हा आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केले, पण नंतर माधुरीने पुढे जाऊन एक न्हवे तर अनेक हिट चित्रपट दिले, त्यानंतर ती बॉलिवूड मधील धकधक क्वीन बनली, पण डॉ श्रीराम नेनेच्या प्रेमात ‘वेडी’ झालेल्या माधुरीने सर्व काही सोडून त्याच्यासोबत स्थायिक होण्याचा निर्णय घेतला होता. यानंतर, दोघांनीही १७ ऑक्टोबर १९९९ रोजी लग्न केले.

९० च्या दशकात माधुरी दीक्षितसमोर कोणतीही अभिनेत्री उभी राहू शकली नाही, परंतु डॉक्टर श्रीराम नेनेच्या प्रेमात माधुरीने हा फेम सोडण्याचा निर्णय घेतला होता.

१७ ऑक्टोबर १९९९ रोजी माधुरी दीक्षितने श्रीराम नेनेसोबत लग्न केले. एका इंटरव्ह्यू मध्ये त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की तुम्ही यशाच्या अफाट शिखरावर असताना तुम्ही अचानक बॉलिवूड सोडणे हे धक्कादायक होत. त्यावर माधुरीने छान उत्तर दिलं ती म्हणाली की मी तेव्हा प्रेमात पडले होते.

मित्रानो अनुपम खेर याच्या टॉक शो मध्ये माधुरी दीक्षितने एक खु’ला’सा केला ती म्हणाली की एकेदिवशी माझ्या भावाने मला तातडीने अमेरिकेत बोलावले. मी चित्रपटाच्या तारखा चेंज करून तिकडे पोहचले तिकडे एका पार्टीत माझा भाऊ अजित दीक्षित याने माझी ओळख श्रीराम नेने याच्यासोबत करून दिली ते त्याच्या जवळचे मित्र होते.

त्यानंतर आमच्या भेटीगाठी वाढल्या आणि आम्ही एकमेकांवर प्रेम करू लागलो. मग आम्ही लग्न करायचा विचार केला. तर असा होता तो किस्सा.

You might also like