एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

महेश मांजरेकरांची लेक पूर्ण करतेय ‘लंडन ड्रीम्स’! पहा तिचा लंडनचा फेरफटका..

कलर्स मराठी वाहिनी वर सुरू झालेल्या ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ ची धमाल रोज पाहायला मिळते. यातील स्पर्धकांबद्दल देखील लोकांना कमालीची उत्सुकता आहे. स्पर्धकांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी प्रेक्षक सदैव तयार आहेत. पण या स्पर्धकांबरोबरच अजून एका व्यक्तीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यात लोकांना बरेच स्वारस्य आहे. कोण आहे ही व्यक्ती?

ही व्यक्ती आहे ‘बिग बॉस मराठी सिझन ३’ चे होस्ट महेश मांजरेकर. अभिनयाबरोबरच दिग्दर्शन आणि निर्मिती क्षेत्रातही त्यांनी बरेच नाव कमावले आहे. त्यांच्या पत्नी मेधा मांजरेकर देखील अभिनेत्री आहेत. महेश मांजरेकर यांना त्यांच्या पहिल्या पत्नीपासून सत्या आणि अश्वमी अशी दोन मुले आहेत. महेश आणि मेधा यांना सई नावाची. तसेच मेधा मांजरेकरांच्या मुलीला म्हणजेच गौरी इंगवलेला देखील महेश आपल्या मुलीप्रमाणेच मानतात. महेश आणि मेधा यांची मुलगी सई ने २०१९ मध्ये ‘दबंग ३’ या गाजलेल्या चित्रपटातून अभिनय सृष्टीत पदार्पण केले.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Mahesh Manjrekar (@maheshmanjrekar)

आयुष शर्माबरोबर सई ‘मांझा’ या गाण्यात देखील दिसली होती. गाण्यातील आयुष आणि सईची केमिस्ट्री लोकांना खूप भावली होती. ती ‘मेजर’ या चित्रपटातही भूमिका करणार असल्याचं बोललं जातंय. सध्या सई ‘हिरोपन्ती २’ या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी लंडनमध्ये आहे. या चित्रपटात अभिनेता टायगर श्रॉफ प्रमुख भूमिकेत दिसेल. लंडन मध्ये सई खूप एन्जॉय करताना दिसत आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

सई सोशल मीडिया वर खूप सक्रीय असते. आपले लंडन मधील वास्तव्याचे फोटो ती सोशल मीडिया वर शेअर करत असते. तेथील रस्त्यांवर फेरफटका मारतानाचे, तसेच तेथील विविध डिशेसचे फोटो देखील ती सोशल मीडिया वर अपलोड करताना दिसत आहे.

एकूणच काय, तर सई आपले ‘लंडन ड्रीम्स’ जगताना दिसत आहे. सईच्या चाहत्यांना अर्थातच तिचा हा लंडन लूक आवडला आहे. तिच्या या फोटोंचे कौतुक करत त्यांनी आपल्या लाईक्स आणि कमेंट्स मधून भरभरून पसंती दर्शवली आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Saiee M Manjrekar (@saieemmanjrekar)

मित्रांनो, तुमच्या आवडत्या कलाकारांच्या अशाच काही घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तुमच्या आवडत्या कलाकारांबद्दल अशीच काही मनोरंजक माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या वेबसाईटला तसेच सोशल मीडिया पेजेस ना नक्की भेट देत राहा. आम्हाला सोशल मीडिया वर फॉलो करायला विसरू नका. तसेच तुम्हाला आवडलेले लेख लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका.

You might also like