एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

लक्झरी अपार्टमेंट्सपासून आलिशान फार्म हाऊसपर्यंत विराट-अनुष्काकडे आहे इतक्या कोट्यवधींची सं’पत्ती..जाणून डोळे पांढरे कराल..

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांना ‘पॉवर क’पल्स’ म्हटले जाते. आई-वडील झाल्यानंतर ही जोडी नेहमीच चर्चेत असते. अनुष्का आणि विराट सध्यातरी सर्वात श्रीमंत भारतीय सेलिब्रिटी क’पल्सपैकी एक आहेत असे म्हणणे देखील चुकीचे ठरणार नाही. एका रिपोर्टनुसार अनुष्का आणि विराट या दोघांची नेटवर्थ जोडली गेली तर त्यांची एकूण संप्पती सुमारे १२०० कोटी आहे.

सर्व सेलिब्रिटींप्रमाणेच त्यांनी आपल्या उत्पन्ना पैकी एक मोठा हिस्सा प्रॉपर्टी मध्ये इनवेस्ट केला आहे. मुंबईतील आलिशान व्हिलापासून ते अलिबागमधील आलीशान फार्म हाउसपर्यंत विरुष्काकडे कोट्यवधींची संपत्ती आहे.

मुंबईत ३४ कोटीचा लक्झरी अपार्टमेंट :

अनुष्का आणि विराट कोहलीची मुंबई मध्ये एक अपार्टमेंट आहे. विराट आणि अनुष्काचा मुंबईतील वरळी येथे एक अतिशय आलिशान फ्लॅट आहे, जो विराटने ३४ कोटींमध्ये विकत घेतला होता. अनुष्काशी लग्नानंतर विराट दिल्लीहून मुंबईत शिफ्ट झाला. विराट आणि अनुष्काचे अपार्टमेंट गगनचुंबी इमारत ‘ओमंकार  १९७३’ च्या ३५  व्या मजल्यावर आहे. विराट आणि अनुष्काच्या घरातुन खूपच सुंदर अरबी समुद्र दिसतो. विराटचे घर तब्बल 7000 स्कैयर फीट आहे. विराट-अनुष्काचे घर इमारतीच्या सी ब्लॉकमध्ये आहे. हे 5BHK सी-फेसिंग अपार्टमेंट आहे. आपल्या घरात विराटने  आपली स्वतःची जिम देखील बनवली आहे. विराट आणि अनुष्काने आपल्या घराची इतकी सुंदर सजावट केली आहे की प्रत्येकजण या घराची प्रशंसा करतो.

 

अलिबाग मधील फार्महाऊस :

अनुष्का आणि विराटकडे मुंबईशेजारील अलिबागमध्ये एक आलिशान फार्महाऊस आहे. काही दिवसा पर्यंत पर्यंत कोणालाही अनुष्का-विराटच्या या फार्महाऊसबद्दल माहिती नव्हती. पण लॉकडाऊन दरम्यान विराटने इंग्लंडचा माजी क्रिकेटर केविन पीटरसनला इन्स्टाग्राम लाइव्ह दरम्यान त्याच्या अलिबाग फार्महाऊसविषयी माहिती सांगितली. अनुष्का आणि विराटने त्यांच्या फार्महाऊसमध्ये लॉकडाउनचा बराच वेळ सोबत घालवला होता. रिपोर्ट्सनुसार अनुष्का आणि विराटचे हे फार्महाऊसही त्यांच्या मुंबई घराप्रमाणेच खूप आलिशान आहे. ज्यामध्ये प्राइवेट पूल देखील आहे. इतकेच नाही तर त्याच्या फार्महाऊसमध्ये एक गार्डन देखील आहे.

गुरुग्राममध्ये ८० कोटीचा व्हिला :

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये विराट कोहलीने स्वतःचे एक शानदान घर विकत घेतले आहे. त्याला व्हिला म्हणणे चुकीचे ठरणार नाही. त्यांचे भव्य घर गुरुग्राममधील DFL सिटी फेज़ 1 मध्ये आहे.

नमस्कार वाचक मित्रांनो, आमचा हा लेख तुम्हला कसा वाटलं आम्हला कंमेंट करून नक्की कळवा. मनोरंजन क्षेत्रामधील असेच अधिक लेख आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत असतो. लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कारण यामुळे आम्हाला आणखी लेख लिहायला प्रोत्साहन मिळते.

You might also like