एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

एकेकाळी सुप्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे करायचे हे काम त्यानंतर झाले असे काही आले सिनेमात बदलले आयुष्य..

भारतीय चित्रपटसृष्टीला आज १०० वर्षे उलटुन गेली आहेत. सुरूवातीला आवड किंवा हौस म्हणून काही मंडळी चित्रपट करायचे. पूर्णवेळ किंवा ठरवून या क्षेत्रात काम केलेल्यांची फार कमी नावं आपल्याला दिसतात. पण या क्षेत्राचं एका व्यवसायात रूपांतर होऊ शकतं हे अनेकांनी जाणलं आणि इकडे पावलं टाकायला सुरूवात केली.

आजही चित्रपटसृष्टीला व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली असली तरी बहुतांश लोकांना हा एक सेफ व्यवसाय म्हणून मान्य नाही. आणि याच कारणाने बऱ्याच कलाकारांचे बाकीचे काही व्यवसाय असतात. किंवा एखादी पदवी त्यांनी पूर्ण केलेली असते.

काही वर्षांपूर्वीच्या काळात तर ही परिस्थिती फारच गडद होती.जे कुणी आज यशस्वी सिनियर कलाकार आहेत, त्यांनी कुठल्या ना कूठल्या कामापासून त्यांच्या करियरची सुरवात केलेली दिसुन येते. आजही आपण अशाच एका कलाकाराबद्दल जाणुन घेणार आहोत.

मराठी चित्रपटांमध्ये हरएक प्रकारच्या भूमिका निभावून प्रेक्षकांची मने जिंकणारा, मराठीच न्हवे तर आयुष्याच्या उत्तरार्धात हिंदी चित्रपटांतूनही आपला बोलबाला करणाऱ्या, केवळ ५० वर्षे आयुष्य जगलेल्या एका कलाकाराबद्दल आपण जाणून घेणार आहोत. हा कलाकार म्हणजे अर्थात लक्ष्मीकांत बेर्डे होय.

लक्ष्मीकांत बेर्डे यांना लहानपणापासून अभिनयाची अतिशय आवड होती. पण अभिनय क्षेत्रात आपलं करियर घडवण्याआधी लक्ष्मीकांत बेर्डे हे लाॅटरी च्या तिकिट विक्रीचं काम करत असत. आपल्या अभिनयाच्या आणि उत्तम टायमिंग च्या जोरावर त्यांनी मधल्या काळात पडद्यावर अक्षरशः थैमान घातले. लक्ष्मीकांत बेर्डे आणि अशोक सराफ ही जोडी सुपरहिट ठरली होती. बेर्डे यांना १९८४ साली आलेल्या “लेक चालली सासरला” आणि “धुमधडाका” (१९८५) या चित्रपटातून प्रचंड प्रसिद्धी मिळाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by laxmikant berde (@laxmikantberdeofficial)

२६ आॅक्टोबर, १९५४ रोजी लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म झाला. बेर्डे कुटुंबात पाच मुले होती. लक्ष्मीकांत बेर्डे यांचे मुळ गाव रत्नागिरी. फारच कमी लोकांना ही माहिती आहे कि, सुरूवातीच्या काळात कुटुंबाला हातभार लावण्यासाठी म्हणून लक्ष्मीकांत हे चक्क लाॅटरी चे तिकिट विकत असत.

नंतर ते मराठी साहित्य संघामध्ये कर्मचारी म्हणून काम करू लागले. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असलेल्या लक्ष्मीकांत यांनी याच काळापासून रंगमंचावर नाटकातून काम करायला सुरूवात केली. “लेक चालली सासरला” या चित्रपटातुन त्यांनी चित्रपट क्षेत्रात पदार्पण केले.

साहित्य संघामध्ये काम करत असताना १९८३-८४ मध्ये त्यांनी टूर टूर हे नाटक केलं. खऱ्या अर्थाने या नाटकाने त्यांना प्रसिद्धी मिळाली. तिथून पुढे अनेक नाटकांसह त्यांनी चित्रपटांमधूनही काम करायला सुरुवात केली.

महेश कोठारे या दिग्दर्शकाबरोबर त्यांनी अनेक सुपरहिट चित्रपट दिले. यामध्ये “धुमधडाका” (१९८४) आणि “दे दना दन” (१९८५) या चित्रपटातून बेर्डे यांची एक वैशिष्ट्यपूर्ण ओळख रसिंकांना झाली. यख चित्रपटातून त्यांनी अफलातुन विनोदी काम केले. इथून ते एका वेगळ्याच यशाच्या शिखरावर पोहोचले.

तद्नंतर लक्ष्मीकांत बेर्डे यांनी दिग्दर्शक महेश कोठारे आणि अशोक सराफ यांच्यासोबत अनेक वर्षे काम केली. या त्रिकूटाने मराठी चित्रपटसृष्टीत अनेक मनोरंजनपर चित्रपट सादर केले. आजही अनेक चाहते यांच्या अनेक चित्रपटांचे चाहते आहेत. “धुमधडाका” हा त्यापैकीच एक चित्रपट होय. लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मराठी चित्रपटसृष्टीत तर आपला ठसा उमटवलाच पण सोबत त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही बरंच काम केलं.

९० च्या दशकात हिंदीमध्ये प्रचंड गाजलेला चेहरा म्हणजे सलमान खान. सलमान खान यांच्या १९८९ साली आलेल्या “मैने प्यार किया” या हिंदी चित्रपटामध्ये पहिल्यांदा काम केले. इथे त्यांची बाॅलिवुड मध्ये एंट्री झाली. तिथून पुढे मग लक्ष्मीकांत बेर्डे यांनी “आरजू”, “साजन”, “हम आपके है कौन”, “मेरे सपनों की रानी”, “बेटा”, आणि “अनारी” या त्यांनी काम केलेल्या चित्रपटांना चांगले यश मिळाले.

 

View this post on Instagram

 

A post shared by laxmikant berde (@laxmikantberdeofficial)

आपल्या अभिनयाने अनेक चाहते निर्माण केलेल्या आणि विनोदी शैलीने सर्वांना खळखळून हसवणाऱ्या या कलाकाराचे १६ डिसेंबर २००४ मध्ये नि’धन झाले.

You might also like