एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

या गावाचे नाव चक्क सल्लू! गावातील तरुणांची लग्न होईनात म्हणून बदलून टाकले गावाचे नाव..

लग्न होईनात म्हणून चक्क सलमान खानच्या नावाने नवीन नामकरण केलंय या गावकऱ्यांनी..

नैसर्गिक आपत्ती कधी आणि केव्हा घडेल सांगता येत नाही. आपल्याला महापूर, भूकंप, चक्रीवादळ या आपत्तींना तोंड द्यावे लागते. यामुळे जीवित आणि वित्त हानी मोठया प्रमाणात होते. जनजीवन विस्कळित होते. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा ठाम रहायला हवे. सर्व काही पुन्हा नव्याने स्थापित करता येते.

बॉलीवुड मध्ये अनेक कलाकार काम करतात. उत्कृष्ट अभिनय करून प्रेक्षकांचे मन जिंकतात. अनेक कलाकार प्रसिद्ध झाले आहेत. बॉलीवुडमधील प्रसिद्ध अभिनेता म्हणजे सलमान खान होय. त्याने अनेक चित्रपट गाजवले आहेत. कमी वयात या क्षेत्रात काम करायला सुरुवात केलेल्या या अभिनेत्याने प्रेक्षकांचे मन जिंकून घेतले. सिनेमामध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारून अनेक सिनेमे हिट केले.

सलमान खान लग्न कधी करणार हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडलेला आहे. तसेच हा तर राष्ट्रीय प्रश्न बनला असल्याचे उपहासाने बोलले जाते. आता सलमान खान आणि लग्न या गोष्टी कधी जुळतील की नाही अस वाटत आहे. आता लग्न करायचं की नाही हा सलमान खानचा वैयक्तिक प्रश्न आहे. तर आज आपण जाणून घेऊया की आपल्या आवडत्या सल्लुचे नाव एका गावाला देण्यात आले आहे. काय आहे सत्य चला पाहूया…

कर्नाटक राज्यातील गडाग जिल्ह्यात आणि रॉन तालुक्यात एक गाव आहे. पूर्वी या छोट खेड्याचे नाव ‘गडागोली’ असे होते. परंतु, गेल्या काही दहा वर्षांपासून या गावात अविवाहित तरुणांची संख्या वाढली आहे. त्यामुळेच गावकऱ्यांनी त्यांच्या गावाचे नाव बदलले आहे. त्यांनी चक्क गावाचे नामकरण सलमान खानच्या नावावरून केले.

या गावात कधी दुष्काळ, कधी महापूर अशा नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी अडचणीत येत आहेत. या गावात शक्यतो तरुण हे शेतकरीच आहेत. पुरामुळे गावात वित्त हानी मोठ्या प्रमाणात झाली होती, त्यामुळे सगळ्यांचे नुकसान झाले होते. म्हणूनच काही वर्षामागे त्यांना एका नवीन गावात ५०० घरे बांधण्यात आली. परंतु, अजून त्या लोकांना म्हणजेच पूरग्रस्तांना दिलेली नाहीत. म्हणूनच गावकऱ्यांकडून राहायला चांगली घरे नाहीत. घरांना दारे खिडक्या नाहीत. अशी परिस्थिती झाली आहे.

शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. नैसर्गिक आपत्तीमुळे शेती असूनही पीक घेता येत नाहीये. पिकत नसल्याने त्यांच्या हाताला काम सुद्धा नाही. अनेकांना लग्नासाठी मुलगी मिळत नाहीये. मुलांच्या लग्नाचे प्रस्ताव नाकारण्यात येत आहेत. अशा परिस्थितीत कोण बर आपली मुलगी देईल ना. सध्या गावात तीस ते चाळीस वयोगटातील चक्क १२० तरुण अविवाहित आहेत. एका तरुणाचे म्हणणे आहे की आम्ही आजही आम्हाला राहण्यासाठी चांगली घरे मिळतील याची वाट पाहत आहोत. इतके तरुण अविवाहित असताना, मुलींच्या बाबतीत परिस्थिती वेगळीच आहे.

बायको मिळवण्यासाठी गावकऱ्यांनी स्थानिक आमदार यांच्याकडे मदत मागत आहेत. एव्हढेच नव्हे तर माजी मंत्री सी. सी. पाटील यांच्याकडे सुद्धा बायको मिळवून देण्यासाठी साकडे घालत आहेत. परंतु, पूरग्रस्त गावातील या तरुणांना कोणी मुली द्यायला तयार नाहीत. ‘रॉन’ तालुक्यात एक नवीन गाव तयार होत आहे परंतु तिथे स्थलांतर करण्यासाठी काही लोकांनी पूर्वी नकार दिला. सध्या हा भाग जाते आणि झुडूपणी भरलेला आहे. हा परिसर आम्ही पुन्हा स्वच्छ करु. तसेच घरांची दुरुस्ती सुद्धा करु, अशी ग्वाही एका अधिकाऱ्यांनी दिली आहे.

तर मित्रहो आजचा हा लेख तुम्हाला कसा वाटला. हा लेख तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. हा लेख आवडल्यास नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका.

You might also like