एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘लगान’ मधली गौरी आता दिसते अशी! ग्रेसी सिंग मध्ये झाला आहे बराच बदल..

२००१ ला ‘लगान’ चित्रपट प्रदर्शित झाला. बऱ्याच कारणांनी हा चित्रपट चर्चेत राहिला. चित्रपटाची प्रसिद्धी हे एक कारण होतंच, पण अजून कारण होतं ते म्हणजे यातली अभिनेत्री. ग्रेसी सिंग या अभिनेत्रीने या चित्रपटात आमिर खान बरोबर ‘गौरी’ नावाची भूमिका साकारली होती.

Third party image reference

तिच्या या भूमिकेचे खूप कौतुक झाले. चित्रपटात संधी मिळाल्याने ग्रेसीने खूप जीव ओतून काम केले. लोकांनी आयुष्यभर लक्षात ठेवावे असे काहीतरी आयुष्यात केले पाहिजे, असे तिला वाटत असे.

त्यामुळे तिने आपले सगळे लक्ष या भूमिकेवर केंद्रीत केले. खूपदा त्यासाठी ती सेटवरच्या लोकांशीदेखील बोलत नसे. लोक तिला माघारी गर्विष्ठ म्हणू लागले होते. पण ग्रेसी आपल्या कामात मग्न होती.

ग्रेसी सिंगने त्यानंतर २००३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गंगाजल’ आणि ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ यांसारखे हिट चित्रपट दिले. मात्र त्यानंतर तिची ग्रेस फारशी चालू शकली नाही असे दिसते. ग्रेसीने १९९७ मध्ये सुरू झालेल्या ‘अमानत’ या मालिकेतून आपल्या अभिनयाची सुरुवात केली.

Third party image reference

‘पृथ्वीराज चौहान’ (१९९८) या मालिकेतही तिने भूमिका साकारली आहे. हू तू तू (१९९९), हम आपके दिल में रहते है (१९९९), अरमान (२००३), मुस्कान (२००४), वजह- अ रीझन टू किल (२००५) या आणि अशा अनेक चित्रपटांमध्ये तिने काम केले. पण लगान, गंगाजल आणि मुन्नाभाई एमबीबीएस चित्रपटांना जेवढं यश मिळालं, तेवढं यश ग्रेसीच्या बाकी चित्रपटांच्या नशिबात नव्हतं.

२०१५ नंतर ग्रेसीने एकही चित्रपट केला नाहीये. एखाद्या अभिनेत्रीचे एकामागून एक चित्रपट फ्लॉप व्हायला लागले की चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माते त्या अभिनेत्रीकडे पाठ फिरवून रिकामे होतात. ग्रेसीने २०१५ ला ‘संतोषी माँ’ ही मालिका स्वीकारली. या मालिकेत तिला मध्यवर्ती भूमिका साकारायला मिळाली.

छोटा पडदा काही ग्रेसी साठी नवी गोष्ट नव्हती. तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात देखील छोट्या पडद्यावरूनच झाली होती. २०२० मध्ये पुन्हा तिने ‘संतोषी माँ- सुनाए व्रत कथाएँ’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारत छोट्या पडद्यावर पुनरागमन केले.

Third party image reference

ग्रेसीने हिंदी बरोबरच तेलगू, पंजाबी, मल्याळम, कन्नड, मराठी, गुजराती आणि बंगाली चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे. ‘आंधळा डॉक्टर’ (२०१५) या चित्रपटात तिने मारीया नावाची भूमिका केली होती. एक अभिनेत्री असण्याबरोबरच ग्रेसी सिंग भरतनाट्यम् आणि ओडिसी डान्सर आहे. सध्या ग्रेसी अध्यात्माकडे वळली असल्याचे बोलले जाते.

Third party image reference

You might also like