एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘कृषिकन्या’ म्हणून मिळाली प्रसिद्धी! पण ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण?

सोशल मीडिया चा वापर अनेक लोक वेगवेगळ्या कारणांसाठी करत असतात. बऱ्याच जणांनी सोशल मीडिया वर आपले फोटो आणि व्हिडिओ टाकून प्रसिद्धी मिळवली आहे. अशीच एक चिमुरडी आहे जिने आपल्या डान्सने सगळ्यांना वेड लावले आहे. ‘कृषिकन्या’ म्हणून प्रसिद्ध झालेली ही चिमुरडी नक्की आहे तरी कोण? चला पाहूया.

काही दिवसांपासून सोशल मीडिया वर एका चिमुरडीचा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. यामध्ये ही चिमुरडी शेतात डान्स करत आहे आणि मागे शेतात तिचे वडील तिला साथ देताना दिसत आहेत. अनेक जणांना या चिमुरडीबद्दल उत्सुकता लागून राहिली आहे. या मुलीचे नाव काय आहे, ती कुठे असते, काय करते याबद्दल जाणून घेण्यात लोकांना फारच रस निर्माण झाला आहे.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by krupa wakchaure (@krupa_wakchaure_official)

या कृषिकन्येचे नाव आहे कृपा वाकचौरे. कृपा केवळ सात वर्षांची आहे. ती अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातील एक लहानसे गाव पिंपळगावची आहे. कृपाला लहानपणापासूनच नृत्याची आवड आहे. तिचे वडील दीपक वाकचौरे कृपा साधारण साडेतीन वर्षांची असल्यापासूनच तिला डान्स करण्यासाठी प्रोत्साहन देत होते. कृपाला एक चांगली नृत्यांगणा करावी असे तिच्या मावशीचे स्वप्न आहे.

हे स्वप्न पूर्ण व्हावे आणि कृपाला चांगले प्रशिक्षण मिळावे यासाठी तिचे वडील तिला PVR डान्स अकॅडमीचे प्रशिक्षक प्रशांत दिवेकर यांच्याकडे घेऊन गेले. मात्र कृपा तेव्हा खूपच कमी वयाची असल्याने तिला अकॅडमी मध्ये प्रवेश मिळाला नाही. कृपाच्या वडीलांनी कृपाच्या डान्सचा एक व्हिडिओ प्रशांत दिवेकर यांना पाठवला. तो व्हिडिओ बघून ते भारावून गेले.

याची परिणीती पुढे कृपाला अकॅडमी मध्ये प्रवेश मिळण्यात झाली. प्रशांत दिवेकर कृपाला डान्स शिकवू लागले. कृपाला तिथे आता जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या तीन वर्षांत कृपाने खूपच प्रगती केल्याचे दिसून येते. या अकॅडमी मुले अनेक लहान मुलामुलींना डान्सचे योग्य प्रशिक्षण मिळाले आहे. बऱ्याच मुलामुलींनी अनेक पारितोषिकेही मिळवली आहेत.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by krupa wakchaure (@krupa_wakchaure_official)

कृपा वाकचौरेचं इंस्टाग्रामवर स्वतःचं अकाऊंट आहे. या अकाऊंट वर तिची आई तिचे डान्स व्हिडिओ शूट करून टाकत असते. आजवर कृपाने अनेक हिंदी आणि मराठी गाण्यांवर डान्स केला आहे. तिचे हावभाव आणि डान्स मधला जोश पाहिला असता ही मुलगी खूप मोठी डान्सर होण्याची चिन्हे दिसतात. तिचा ‘ओ शेठ, तुम्ही नादच केलाय थेट’ हा डान्स व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे.

You might also like