एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

दुःखद: कीर्तन सुरु असतानाच कीर्तनात दंग झालेल्या कीर्तनकार ताजुद्दीन महाराज यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृ’त्यू..

क्रांतिकारी कीर्तनकार म्हणून प्रसिद्ध असलेले ह.भ.प ताजुद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन करत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने निध’न झाले आहे. धुळ्यातील जामदा गावात हे कीर्तन सुरू होते. कीर्तन सुरू असताना अचानक ते खाली कोसळले. उपचारासाठी त्यांना दवाखान्यात नेत असताना वाटेतच त्यांनी प्राण सोडले. परभणी जिल्ह्यामधील गंगाखेड तालुक्यातील त्यांच्या मूळ गावी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

धुळे जिल्ह्यामधील साक्री तालुक्यातील जामदा गावात रात्रीच्या वेळी ह.भ.प ताजुद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन सुरू होते. श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी महाराज पारायण सप्ताहाच्या निमित्ताने सोमवारी सातव्या दिवशी (२७ सप्टेंबर) त्यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन सुरू असताना अचानक ताजुद्दीन महाराज याना हृदयविकाराचा झटका आला आणि ते खाली बसले. स्थानिकांनी त्यांना काही वेळातच नंदुरबार येथे उपचारासाठी नेले. मात्र तेथे नेत असताना वाटेतच त्यांची प्राणज्योत मालवली.

सुरुवात: ताजुद्दीन महाराजांनी आपल्या सांप्रदायिक कार्याची सुरुवात औरंगाबादेतून केली होती. कीर्तन, भारुडे, गवळणी, रामायण, संत साहित्य, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावरकर यांचे ते गाढे अभ्यासक होते. आपल्या पहाडी आवाजाच्या कीर्तनातून त्यांनी नेहमीच समाज प्रबोधनाचे कार्य केले. हिंदू धर्माबरोबरच महाराजांनी मुस्लिम, बौद्ध, जैन, ख्रिश्चन या धर्मातील चांगल्या गोष्टीही आपल्या कीर्तनातून लोकांसमोर आणल्या आहेत. त्यांचे कार्य खूप मोठे आहे. धार्मिक कट्टरपंथियांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी वारकरी संप्रदायाचे काम खूप निष्ठेने केले, अशी भावना वारकरी सेवा संघ, महाराष्ट्र यांनी व्यक्त केली आहे.

ज्याचा शेवट गोड: आपल्या कीर्तनांतून महाराज नेहमी सांगत, की ‘मी मुस्लिम धर्मात जन्माला आलो असलो, तरी हिंदू धर्मातच मरणार. दोन्ही धर्म मला प्रिय आहेत.’ संत साहित्याच्या स्पर्शामुळे हिंदू धर्म त्यांना प्रिय असल्याचं ते सांगत. दोन वर्षांपूर्वी साक्री तालुक्यातील प्रतापूर येथे सप्ताहानिमित्त तुजुद्दीन महाराज शेख यांचे कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी महाराज म्हणाले होते, की मला कीर्तन करताना मरण आले, तर माझ्यासारखा भाग्यवान मीच असेन. दोन वर्षांपूर्वीचा हा प्रसंग आणि नुकतेच जामदा गावात झालेले त्यांचे नि’धन या दोन्ही घटनांचे साक्षीदार ठरलेले ह.भ.प संदीप महाराज वसमार यांनी सांगितले, की ‘माझ्या डोळ्यांसमोरच या दोन्ही घटना घडल्या. हा विलक्षण योगायोग महाराजांच्या जीवनात आला. शेवटी हेच म्हणावे लागेल, की शेवट तो भला बहु गोड झाला.’

You might also like