एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

आमिर खानची दुसरी पत्नी किरण राव आहे या राजघराण्याची नात! नुकताच झाला घट’स्फो’ट..

बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी नुकताच घट’स्फो’ट घेतला. इंडस्ट्रीला आणि तमाम प्रेक्षकवर्गाला ही बातमी धक्का देणारी होती. डिसेंबर २००५ मध्ये किरण आणि आमिर विवाहबद्ध झाले. किरण ही आमिरची दुसरी पत्नी असून त्या दोघांना आझाद राव-खान हा मुलगाही आहे. नुकतेच दोघे पती-पत्नी या नात्यातून विभक्त झाले असले तरी त्यांचा मुलगा आझादचा सांभाळ ते दोघे मिळून करणार असून “आम्ही अजूनही एकाच कुटुंबाचा भाग आहोत” असेही त्यांनी सांगितले आहे.

२००२ मध्ये आमिर खानने त्याची पहिली पत्नी रीना दत्ता हिच्यापासून घट’स्फो’ट घेतला होता. ‘लगान’ चित्रपटाच्या शूटींगच्या वेळी आमिर आणि किरण राव यांची ओळख झाली. किरण राव त्यावेळी ‘लगान’ चित्रपटासाठी असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम पहात होती. मात्र ही ओळख त्यावेळी फक्त ‘ओळख’ च होती. आमिरने एका मुलाखतीत याचा खुलासा केला. “त्यावेळी किरण ही माझ्यासाठी फक्त टीम मधली एक सदस्य होती”, असे त्यावेळी त्याने सांगितले.

एकदा किरणने कामासाठी आमिरला फोन केला. हा फोन जवळपास तीस मिनिटे चालू होता. यावेळी दोघेही एकमेकांमुळे प्रभावित झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांना डे-ट करण्यास सुरुवात केली. जवळपास दोन वर्षे एकमेकांना डे-ट केल्यानंतर दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला आणि डिसेंबर २००५ मध्ये लगीनगाठ बांधली. जवळपास पंधरा वर्षं चालू असलेला त्यांचा हा संसार आता मात्र मोडला आहे.

लग्नानंतर दोघांनी मिळून अनेक चित्रपटांवर काम केलं आहे. किरणची ओळख जनसामान्यांत केवळ ‘आमिरची पत्नी’ अशी असली तरी किरण एक निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शिका देखील आहे. यापलीकडे तिची अजून एक ओळख आहे. किरणचे नाते राजघराण्याशी आहे. अभिनेत्री आदिती राव हैदरी ही तिची मामेबहीण आहे. तेलंगणाची राजधानी हैद्राबादपासून १४९ किमी वर असलेल्या वानापार्थीशी किरणचा संबंध आहे. किरणचे आजोबा रामेश्वर राव हे वानापार्थीचे राजे होते.

काय मंडळी, ऐकून धक्का बसला ना? आमिर आणि किरणचा घट’स्फो’ट ही जशी धक्कादायक बाब आहे तशीच किरण रावचा इतिहास आणि तिचे राजघराण्याशी असलेले अत्यंत जवळचे नाते या गोष्टीदेखील तितक्याच धक्कादायक आहेत. हे सर्व बघून प्रसिद्ध सेलिब्रेटींच्या नावामागे असेही काही किस्से असू शकतात याची खात्री पटते. तर मंडळी, आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तो शेअर करायला विसरू नका.

You might also like