एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

घट’स्फो’टानंतर सुद्धा अमीर खानची पत्नी आहे एवढ्या कोटी मालमत्तेची मालकीण, जगते खूपच लग्जरी लाईफ..पहा

प्रसिद्ध अभिनेता व परफेक्शनिस्ट म्हणून ओळखला जाणारा आमीर खान आणि त्याची पत्नी किरण राव या दोघांनी नुकताच एकमेकांच्या संमतीने घट-स्फो-ट घेतला आहे. त्यामुळे सोशल मिडीयावर यावरून धुमशान चर्चा पाहायला मिळत आहे. चर्चेचे अनेक आयाम आहेत. धर्म, पैसा, प्रसिद्धी किंवा माणूसकी अशा विविध मुद्द्यांवरून सर्वजण आपापली मते मांडत आहेत.

किरण राव आणि आमीर खान यांचे पाणी फाऊंडेशन जोरात सुरू होते. त्याचबरोबर अनेक सामाजिक कामे करताना ते दोघे दिसून यायचे. अनेक मुलाखतीमध्ये ते दोघे एकमेकांसोबत खूप आनंदी असल्याचे दिसून यायचे. त्यामुळे त्यांचा निर्णय सर्व चाहत्यांना धक्कादायक वाटत आहे.

आमीर खान याची किरण राव ही दुसरी पत्नी आहे. २८ डिसेंबर २००५ रोजी आमीर खान याने किरण राव हिच्यासह लग्न केले होते. याआधी आमीरने १९८६ ते २००२ या काळात त्याच्या पहिल्या पत्नीबरोबर संसार केला होता.

आमीर खानने त्याच्या दोन्ही पत्नींसमवेत १५-१५ वर्षांचा संसार केला आहे. या गोष्टीतही तो दुर्देवाने का होईना पण परफेक्शनिस्ट मात्र ठरला आहे. आता यानंतर आमीर कुठला निर्णय घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आमीर खान हा अनेक जणांचा आयडल स्टार आहे. त्याने एकाहून एक उत्तम चित्रपट इंडस्ट्रीला दिलेले आहेत.

आमीर खान त्याच्या पातळीवर कितीही प्रसिद्ध आणि श्रीमंत असला तरीही किरण राव त्याच्यावर अवलंबून नाही. किरण राव हिनेसुद्धा तिची स्वतंत्र ओळख निर्माण करून पैसा आणि प्रसिद्धी या दोन्ही गोष्टी मिळवल्या आहेत. किरण राव ही उमदा लेखक, दिग्दर्शक आणि हुशार निर्माती आहे. तिची २०२० सालची संपत्ती १४६ कोटी इतकी होती.

तिच्याकडे एकूण किती गाड्या, किती घरे आहेत हा तपशिल तिने उघड केलेला नाही. याच तुलनेत आमीर खान याची संपत्ती १४३४ कोटी इतकी आहे. तो प्रत्येक चित्रपटासाठी तब्बल ८५ कोटी आकारतो. किरण राव हिने अनेक सिनेमांचे उत्तम दिग्दर्शन केले आहेत. तिने तिच्या कारकीर्दीत प्रचंड पैसा कमावला आहे. इतकेच नव्हे तर किरण राव ही अनेक संस्थांसोबत काम करताना दिसून येते. त्यामुळे किरण राव ही आत्मनिर्भर असून ती तिचा सांभाळ करू शकते.

अनेक मुलाखतीत किरण राव आणि आमीर खान त्यांच्या प्रेमाचे किस्से शेअर करत असतात. त्यांच्यातली बाँडींग अत्यंत स्ट्राँग दिसून येते. त्यामुळे ते असा निर्णय घेतील असे वाटले नव्हते. पण ही गोष्ट अत्यंत चांगली आहे की त्यांनी हा निर्णय परस्परांच्या संमतीने घेतला आहे. कुठल्याही कपलला त्यांचे निर्णय घेण्याचे या देशात स्वातंत्र्य आहे.

कुठल्याही कपलमधला समजूतदारपणा यावरूनच दिसून येतो की ते एकमेकांच्या निर्णयाचा किती आदर करतात. आमीर आणि किरण या दोघांनाही आयुष्याच्या एका टप्प्यावर स्वतंत्र आयुष्य जगावेसे वाटणे, हे फार अबब करण्यासारखे मुळीच नाही. असे निर्णय घेताना आपण समाजाच्या दबावाला घाबरत असू तर आपल्याला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आपण एका अर्थाने अनादरच करतो आहोत. प्रत्येकाला निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. फक्त इतकेच की आपण आपले निर्णय कुणावरही लादू नयेत.

अनेक लोक याबाबत आंतरजालावर सर्च करत आहेत. त्यांना किरण रावची कदाचित काळजी वाटली असेल. पण किरण राव ही एक सक्षम स्त्री आहेत. तसेच प्रतिभावानसुद्धा आहेत. किरण राव आणि आमीर खान हे दोघे परत एकदा नव्या जोमाने हातात फावडे घेऊन तुफान आलया हे गाणं म्हणत पाणी फाउंडेशनच्या चळवळीत एकत्र दिसून येतील अशी आपण आशा करूया.

You might also like