एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘देवमाणूस’ मधल्या डॉक्टरची खरी बायको पाहिली का? ती देखील आहे एक अभिनेत्री..

झी मराठी वाहिनी वरील ‘देवमाणूस’ मालिकेची चर्चा सर्वत्र आहे. खऱ्या घटनेवर बेतलेली ही मालिका लोकांचे मन जिंकून घेत आहे. यातल्या अजितकुमार, डिंपल, टोन्या, सरू आजी यांसारख्या काही व्यक्तिरेखा लोकांनी डोक्यावर घेतल्या आहेत. आपल्या वेगळ्या ढंगामुळे ही पात्रे विशेष लक्षात राहतात.

यामध्ये मध्यवर्ती भूमिका आहे डॉ. अजितकुमार उर्फ देवीसिंगची. ही भूमिका साकारली आहे अभिनेता किरण गायकवाडने. लोकांना त्याचा या मालिकेतील अभिनय विशेष आवडला आहे.

१२ जून १९९२ ला पुण्यात जन्म झालेल्या किरणने पुण्याच्या यशवंतराव मोहिते कॉलेज मधून आपले शिक्षण पूर्ण केले. त्याने कॉमर्स मध्ये मास्टर्स पदवी मिळवली आहे. किरण गायकवाडला आपण सर्वप्रथम ‘लागिरं झालं जी’ (२०१७) या मालिकेत दादासाहेबांच्या भूमिकेत पाहिलं होतं.

किरणची ही भूमिका प्रेक्षकांचे खूप मनोरंजन करून गेली. त्याचा ‘देअर यू आर’ हा संवाद आणि तो संवाद म्हणण्याची लकब खूपच गाजली होती. या भूमिकेने त्याला खरी प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच त्याला ‘देवमाणूस’ मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारण्याची संधी मिळाली. २०१७ मध्ये त्याचा ‘बघतोस काय मुजरा कर’ हा पहिला चित्रपट प्रदर्शित झाला.

किरण गायकवाडचे लग्न मोनालिसा बगल बरोबर झाले आहे. मोनालिसा देखील एक अभिनेत्री आहे. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘प्रेम संकट’ या चित्रपटातून तिने चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. २०१७ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झाला बोभाटा’ या चित्रपटाने तिला विशेष प्रसिद्धी मिळवून दिली.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Monalisa Bagal (@monalisabagal)

या चित्रपटात ती मयुरेश पेम बरोबर दिसली होती. तिच्या या चित्रपटातल्या कामाचे खूप कौतुक झाले. य चित्रपटामुळेच तिला पुढे ‘ड्राय डे’ (२०१७) या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. तिने त्यानंतर सोबत (२०१८), परफ्युम (२०१९), गस्त (२०२१) या मराठी चित्रपटांमध्ये देखील कामे केली आहेत.

तुम्ही किरण गायकवाड आणि मोनालिसा बगल यांचे कोणते चित्रपट पाहिले आहेत? त्यांपैकी तुम्हाला आवडलेले चित्रपट कोणते? आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. लोकांना कलाकारांच्या खाजगी आयुष्याबद्दल खूप उत्सुकता असते. मात्र चित्रपटसृष्टीतल्या अशा बऱ्याच जोड्यांबद्दल त्यांना माहिती नसते.

अशाच जोड्यांबद्दल तुम्हाला माहिती करून द्यायला आम्ही सदैव तयार असतो. तुमच्या फेवरेट कलाकारांबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आमचे लेख जरूर वाचत चला. तुम्हाला आवडलेले लेख लाईक करा आणि ते शेअर करायला विसरू नका.

You might also like