एकदम झक्कास माहिती दररोज फक्त तुमच्यासाठी!

‘ज्यांना माझं काम आवडलं नाही…’ किरण गायकवाडची भावुक पोस्ट व्हायरल..

‘देवमाणूस’ मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. या निरोपानंतर या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या किरण गायकवाड या अभिनेत्याने आपल्या ‘देवमाणूस’ टीम बरोबरचे काही फोटो शेअर करत एक पोस्ट सोशल मीडिया वर टाकली आहे. सध्या ही पोस्ट जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. या पोस्ट मध्ये त्याने आपल्या या मालिकेच्या चित्रिकरणादरम्यानच्या भावना व्यक्त करत टीमचे आभार मानले आहेत.

या पोस्ट मध्ये किरण गायकवाड लिहितो, “देवमाणूस सीरियल बघता बघता संपली….. खरतर कुठलाही प्रोजेक्ट तेव्हाच चांगला होतो जेव्हा सगळे जीव तोडुन काम करत असतात. माझे सहकलाकार , सर्व तंत्रज्ञ, प्रॉडक्शन टीम, हेअर आणि मेकअप डिपार्टमेंट ते स्पॉट दादां पर्यंत साऱ्यांनी हातभार लावला ….

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by K I R A N G A I K W A D (@kiran_gaikwad12)

देवमाणुस च्या सेटवरचा प्रत्येक माणुस जीव तोडून काम करत होता त्याबदल वादच नाही ; कारण रात्री साडे दहा वाजता प्रदर्शित होणाऱ्या आजवरच्या मालीकांचे टीआरपी रेकॉर्डस देवमाणसू ने मोडले. टीआरपीचे रेकॉर्डस नक्कीच आनंद देतात पण त्यापेक्षाही घराघरातले छोटे नी मोठे रात्री जागनू न चुकता देवमाणूस बघू लागले.”

किरणने प्रेक्षकांचेही आभार मानले आहेत. “या डॉक्टर ला लई हानला पाहेन, हयों कसला डॉक्टर शैतान हाय ह्यो, हा डॉक्टर ह्यच्यातर ****** (अपशब्द)” अशा कमेंट्स त्याला आजवर मिळालेल्या आहेत. त्याच्यावर मिम्स तयार करणाऱ्यांचेही त्याने ‘memers ला पण सलाम यार’ असे म्हणत आभार मानले आहेत. हे सगळे म्हणजे त्याच्या कामाची पावती असल्याचे तो म्हणतो.

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by K I R A N G A I K W A D (@kiran_gaikwad12)

आपल्या या प्रवासाबद्दल आणि टीम बद्दल बोलताना तो म्हणाला, “हा प्रवास खरंच सोपा नव्हता. इतक्या गंभीर विषयाला अत्यंत सोप्या आणि मनोरंजक पद्धतीने प्रेक्षकांसमोर मांडताना मनात साशंकता नक्कीच होती.. पण जशी कागदावर गोष्ट आणि पात्रं आकार घेऊ लागली तशा या शंका मनातून दूर झाल्या. पद्मा मॅडम व मालिकेचे लेखक स्वप्निल सर आणि विशाल कदमने कागदावर ही पात्रं जीवंत केली… सलाम तुमच्या लेखणीला आणि अशी अनेक पात्रं तुमच्या लेखणीतून जन्म घेत राहो.”

‘देवमाणूस’ मालिकेच्या पहिल्या भागाला प्रचंड प्रतिसाद मिळाल्यानंतर निर्माते जर या मालिकेचा दुसरा भाग बनवण्याचा विचार करत असले, तर नवल वाटायला नको. दरम्यान ‘देवमाणूस’ मालिकेचा शेवट बघता प्रेक्षकांना आता या मालिकेच्या दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे.

You might also like